आनंदाच्या दिवाळीचा शिधा किट आधारभूत धारकांना पोहचलेच नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांसह धारक प्रतीक्षेत!

 देता येत नसेल तर फुशारक्या  मारायच्या कशाला?

 शिधा धारकांचा सरकारला सवाल!

कोलाड (श्याम लोखंडे) राज्य सरकारने ऐन दिवाळी तोंडावर येताच तसेच  राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त स्वरूपात व फक्त १०० रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी शिधापत्रिका धारकांना  याचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचं याकरिता कंत्राट देखील देण्यात आलं. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत ऐन दोन दिवस दिवाळीला शिल्लक असून काळ रविवारपर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेला नाही तर रेशन धान्य दुकानदाराने यासाठी पैशाचा देखील भरणा शासनाकडे भरला त्यामुळे धान्य दुकानदारांसह रेशन धारकही या आनंदाच्या शिधा किटकडे डोळे लावून बसले आहेत.

दिवाळीला एक दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यात राज्य सरकाने जाहीर केलेले दिवाळी सणासाठी  शिधा किट स्वस्त आणि मस्त मिळणार या आनंदात सारे धारक डोळे लावून बसले आहेत रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात हे किट पोहचले तर त्याच बरोबर रोहा तालुक्यात देखील काही दुकानदारांकडे अर्धवट स्थितीत पोहचल्याचे समजले तर तर काही अति दुर्गम आणि ग्रामीण भागात हे शिधा किट न पोहचल्याने केवळ येथील धान्य दुकानदाराने नेहमी प्रमाणे तांदूळ आणि गहू देत शिधा किट आले नसल्याचे सांगत माघारी धाडले तर ते आल्यानंतर मिळतील असे काहीजण बोलत आहेत. सर्वांचा आवडता सण असलेल्या दिवाळीला आता एक दोन दिवस शिल्लक राहिले असून त्यात काळ रविवारचा दिवस निघून गेला तर सोमवारी रेशनधान्य दुकाने बंद तर दिवाळी असल्याने सरकारी अधिकारी वर्ग देखील सुट्टीवर मंगळवारी पाडवा तर बुधवारी भाऊबीज त्यामुळे फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेध लागलेल्या गृहिणी स्वस्त धान्य दुकानांमधे १०० रुपयांत मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचत आहेत. फक्त शंभर रुपयांमधे रेशनधान्य दुकानात मिळणारे शिधा किट घेऊन गोड दिवाळी साजरी करण्यात येईल याच प्रतीक्षेत राहिल्या मात्र ते किट त्यांच्या घरात वेळेवर न पोहचल्याने मोठी निराशा झाली असल्याचे दिसून येत आहे.एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो तेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलंय. आपलीही दिवाळी गोड होईल या आशेने लोक रविवारी उशिरापर्यंत दुकानांतपोहोचत होते परंतु रेशन धारक व ग्राहकांना फक्त ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारने जाहीर केलेल्या जाहिरातीत समाधान मानावं लागतय. कारण सरकारचा हा आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही.

राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राज्यातील सात कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होईल असा दावा राज्य सरकारकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठ्या आनंदाने करण्यात आलाय. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा शिधा पुरवठा कंपन्या इतक्या कमी कालावधीत कसा मिळवणार हा प्रश्न आहे. कारण या शिधा वाटपातील महत्वाची अडचण आहे ती म्हणजे हा शिधा ज्या पिशव्यांमधून वाटायचा आहे, त्या पिशव्या उपलब्ध होणे मोठे महत्वाचे  कारण या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापले जाणार आहेत. फोटो छापलेल्या या पिशव्यांमधूनच हे चार पदार्थ एकत्रित एका कीटच्या स्वरुपात देण्याचे आदेश आहेत. त्यामुळे चारही वस्तू आणि त्यासाठीची पिशवी उपलब्ध झाल्यावरच या वस्तू गरजुंपर्यंत पोहचणार आहेत .

रोहा तालुक्यातील काही दुकानातून हे शिधा किट शिधापत्रिका धारकांना मिळाले तर काही दुकानात पोहचलेच नाहीत त्यामुळे काहींना मिळालेच नाहीत याचे कारण समजू शकले नाही परंतु आज देखील ते धारक प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे तर दिवाळी संपल्यावर ही किट या दुकानात उपलब्ध केल्याने त्याला दिवाळी सणाच्या आनंदाचा गोडवा येईल का असा प्रश्न काही शिधापत्रिका धारकांना पडला आहे.१० ऑक्टोबरपासून हा शिधा थेट रास्त धान्य दुकानात मिळेल असं आधी जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर ही तारीख वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. ती देखील उलटली आज २४ तारीख उजाडली आनंदाचा दिवाळी गोड करणारा शिधा दुकानापर्यंत पोहोचलेला नाही. गृहिणी दुकानांमधे दररोज शिधा आला का? म्हणून चौकशी करत आहेत तर जाहीर केलेला शिधा किट मिळेल की नाही याची शाश्वती नाही . पण त्यांना मोकळ्या पिशवीसह परतावं लागतय. त्यामुळे दिवाळीच्या आधी की नंतर हा शिधा आपल्याला मिळेल का हा प्रश्न त्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog