ओबीसी संघटना वाढीला बळ,तर अन्याया विरोधात लढा उभारणार:-सुरेश मगर यांचे रोह्यात रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा सभेत प्रतिपादन!

कोलाड (श्याम लोखंडे) राज्यासह देशभरात ओबीसीचे संख्याबल अधिक आहे त्यामुळे ओबीसीला त्यानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे सन 1931 नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही त्यामुळे काहीसा हा ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा या पासून वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील राजकीयदृष्ट्या पाहिले तर देशात बहुसंख्येने असलेला ओबीसी समाज हा राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे आर्थिक बळ नाही निवडणुकीत त्याला पुरेसा आरक्षण नसल्याने त्याची पिछेहाट होत आहे तर उच्च वर्णीय समाज त्याचा गैरवापर करत आहे त्यामुळे येत्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित गठित करून ओबीसी समाजाच्या वाढीवर भर देत त्यांना बळ देऊन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारला जाणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी रोहा येथील आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकरणी सभेत केले.

ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा कार्यकरणी सभा ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साह वातावरण रोहा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. प्रसंगी यावेळी विचारमंचावर ओबीसी संघर्ष समन्वय समिती व संलग्न जनमोर्चा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष जे.डी.तांडेल,परीट समाज कोकण विभाग अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुदाम शिंदे, प्रद्युम्न ढसाळ,सुरेश पाटील,जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवराम शिंदे,शिवराम महाबळे,बाळशेठ खटावकर,माणगाव कुणबी समाज ता. अध्यक्ष सुभाष भोनकर,आगरी समाज रोहा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे,माजी सभापती लक्ष्मण महाले,तळा सभापती सौ अक्षरा कदम,पत्रकार संध्या पिंगळे,ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे,सरचिटणीस महादेव सरसंबे,रोहा तालुका उपाध्यक्ष उत्तम नाईक,अमोल पेणकर,काशीनाथ धाटावकर,नंदकुमार म्हात्रे,महेश बामुगडे,सुहास खरीवले,तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम,मुरूड तालुका अध्यक्ष अॅड रुपेश पाटील,माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके,सरचिटणीस राजेंद्र खाडे,म्हसळा तालुका अध्यक्ष महादेव पाटील,पेण तालुका समन्वयक दिलीप पाटील,नाभीक समाज जिल्हा सरचिटणीस महेंद्र माने,धाटाव विभागीय अध्यक्ष अमित मोहिते,खांब विभागीय अध्यक्ष श्याम लोखंडे,प्रकाश कोळी,मंगेश रावकर, महेंद्र मोरे,सोपान मोहिते,महेश तुपकर, प्रेषीत बारटक्के,नवनीत डोलकर,लक्ष्मण मोरे,सतिष भगत,रामाशेठ म्हात्रे,अरविंद मगर,राम नाक्ती,आदी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व तालुकास्तरावरील पदाधिकारी ओबीसी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या सभेत उपस्थित ओबीसी समाज बांधवांना अधिक पुढे मार्गदर्शन करतांना मगर यांनी सांगितले की या देशात प्राण्यांची, पक्षांची, झाडांची, जनगणना केली जाते परंतु ओबीसींची जनगणना केली जात नाही

 त्यामुळे आपल्या कुणबी,आगरी, कोळी, नाभिक, कुंभार, सुतार, परीट, शिंपी,सह विविध एकूण पाचशेहून अधिक जाती या ओबीसीत समाविष्ट असलेल्या जातींना शासनाचा हक्क मिळत नसल्याने त्यांच्या न्याहक्कांसाठी लढा म्हणून येत्या 10 नोव्हेंबर रोजी हा समाज सरकारला जाग येण्यासाठी प्रथमतः रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित करून लाखोंच्या संख्येने धडकणार आहे. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर देखील उतरून अन्याय विरोधात हा लढा उभारला जाईल असे शेवटी सांगितले .तसेच तळा तालुक्याच्या सभापती सौ अक्षरा कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की जाती जमातीत सरकार दप्तरी केवल भटकी,एसटी ,एनटी या जातींना आरक्षणानुसार बजेटमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत मात्र तोच दुर्लभ असलेल्या ओबीसी समाजाला सरकारकडून शून्य बजेट देत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे यासाठी व तसेच आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी व उच्च शिक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगत ओबीसी समाज बांधवांचे लक्ष वेधून मोलाचे मार्गदर्शन केले.

तर यावेळी रोहा,माणगाव,तळा, महाड,पेण,सह जिल्हाभरातून तालुका स्तरावरील तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थीत होते तर आलेल्या सर्व तालुक्यातील अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील समस्या व सर्व ओबीसी समाज बांधवांना अधिकाधिक एकत्रित करून आपल्या न्याय हक्कासाठी बळ दिले पाहिजे असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या तसेच दक्षिण रायगड जिल्ह्या ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या महिला अध्यक्षा म्हणून सौ अक्षरा कदम यांची नेमणूक करण्यात आली तर उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा तसेच विविध तालुक्यातील संघटना लवकरात लवकर गठित करण्यात येणार असून तालुका व विभागीय स्थरावर पदांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेतला तर नव्याने तालुकास्तरावर नियुक्त्या केलेल्या पदाधिकारी यांना यावेळी प्रमुख मान्यवर चंद्रकांत बावकर व जे डी तांडेल तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या व सभेच्या सुरवातीला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog