परोपकारी वृत्तीच्या पुगाव गावच्या श्रीमती सुनीता देवकर यांचे दुःखद निधन
खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव गावच्या रहिवासी श्रीमती सुनीता देवकर यांचे मंगळवार दिनांक 11/10/22 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धपकाळात व अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने देवकर परिवारांवर दुःखाचे डोंगर व पुगाव परिसरात शोककळा पसरली आहे .
श्रीमती सुनीता देवकर या सर्वांना भीमा या नावाने सुपरिचित होत्या तसेच त्यांचा स्वभाव शांत संयमी प्रेमळ असा होता सर्वांच्या परोपकारी पडणाऱ्या संयमी वृत्तीच्या,मित भाषी,नम्र स्वभाव,व दयाळू अंतःकरणाच्या,पशु प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या होत्या.
त्यांच्या निधानाची वार्ता समजतात समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय आप्त-स्वकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,नातवंडे,असा मोठा देवकर परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी पुगांव येथील श्री कमलेश्वर मंदिर शेजारील तलावावर होतील तर अंतिम धार्मिकविधी तेरावे रविवार दिनांक 23 ऑक्टो 22 रोजी पुगांव येथील त्यांच्या निवासस्थानी होतील.
Comments
Post a Comment