रोहिणी महाबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

कै. रोहिणी महाबळे
  कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) रोहा तालुक्यातील पाले बु. येथील रहिवाशी रोहिणी गोविंद महाबळे यांचे बुधवार दि.२६/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्यांचे पती शिक्षक होते. परंतु ते अनेक वर्षे आजारी होते.परंतु त्यांनी न डगमगता पतिसेवा केली.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले कुटुंब संभाळले.

   त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,जावई,दिर,जावा,पुतणे, नातवंडे व मोठा महाबळे कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.४ नोव्हेंबर तर उत्तर कार्य विधी रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहे.

Comments

Popular posts from this blog