पेणचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम  ९९.७०% गुण मिळविले स्वरूपवर अभिनंदनाचा वर्षाव!

कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्या पेण तालुक्यातील व पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७०% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे तर याच्या या यशस्वीपणे कामगिरी बद्दल स्वरूपवर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रायगड जिल्ह्यातील नामांकित व नावलौकिक असलेल्या लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग ( बाटू ) या कॉलेज मधुन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके ह्या विद्यार्थीने पदविका परीक्षेत तब्बल ९९.७०% मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची तसेच आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा अधिक उंचावत प्रकाशमान केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात स्वरूप ने उत्तमरीत्या यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेस ला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून 3 ते 4 तास अभ्यास करून त्यांनी हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके यांनी सांगितले. आपल्या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रोफेसर दीपिका शेट यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याची  प्रतिक्रिया स्वरूप शेळके याने दिली. कॉलेजने मला संशोधनाकरिता पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीम वर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व कॉलेजच्या शिक्षकांचा मी आभारी आहे. भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने यावेळी व्यक्त केला.

कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे २ वर्षांपासून सोडविता आले नव्हते. या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली. त्यामुळे स्वरूप ची अभ्यासाची रिविजन तर झालीच व या ९ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता आले अशी माहिती विद्यार्थी स्वरूप ची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालीका स्मिता शेळके यांनी पत्रकारांना दिली.

स्वरूपने पदविका परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने ज. का. ठाकूर मित्र परीवार मेढेखार, आगरी समाजाच्या वतीने अध्यक्ष कैलास पिंगळे, धावेश्वर क्रीडा मंडळ सांबरी, पाटील परिवार सांबरी, शेळके परिवार, नवतरुण नवरात्र मित्र मंडळ सांबरी यांनी स्वरूप शेळके याला सन्मानित केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तर स्वरूप च्या या आगळ्या वेगळ्या यशाबद्दल त्याच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog