रोहा तालुका आगरी ज्ञाती समाजाचे  संस्थापक/अध्यक्ष व माजी रा.जि.प.सदस्य कै.चांगदेव सहदेव निरकर यांचे प्रथम वर्षे श्राद्ध,

गोफण- रोहा (रघुनाथ कडू)रोहे तालुक्यातील ५२ गाव आगरी ज्ञाती समाज्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य कै.चांगदेव सहदेव निरकर यांचे प्रथम वर्षे श्राद्ध दिनांक ०३/०१/२०२२रोजी होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली.

कै.चांगदेव सहदेव निरकर यांच्या कारकिर्दी बदल ते पुढे म्हणाले की ते रोहे तालुक्यातील बिरवाडी तर्फे धोंडखार या गावचे आगरी समाजातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. 

 त्यांची तशी परिस्थिती बेताची होती.प्राथमिक शिक्षण घेत असतांनाच त्यांना समाज कार्याची ओढ लागलेली असायची.सामाजिक कार्यात ते सक्रिय भाग घेत असतांना समाजातील भुजूर्ग मंडळीना त्यांचा हेवा वाटत असे.लहानपणी जास्त करून ते जेष्ठाच्या सानिध्यात असायचे त्यातुनच त्यांना मोठ मोठे निर्णय घेण्याचे धाडस अवगत झाले असावेत असेही त्यांच्या शिष्यगणांनाचे मत आहे.

त्यांनी अनेक वर्षे समाज्याची निष्काम सेवा केली.समाज संघटीत करण्यासाठी ते धोंडखार ते तालुक्यातील वेगवेगळ्या गावी सायकलने प्रवास करत असायचे. पुढे पुढे त्यांना घरची आर्थिक परिस्थिती पहाता पगाराच्या थोडक्या का होईना अशा एका संस्थेत काम करुन समाज हिताचे काम पहात असत.त्या वेळची परिस्थिती फार खराब असल्याने त्यांच्या नंतरच्या पिढीतील मुलाबालांचा शैक्षणिक प्रश्न भेडसावत असे.शहराकडे जायला मुळात लोकांना सायकल किंवा बैलगाडी हाच पर्याय असायचा त्यातून त्याचे गाव तालुक्याच्या टोकावर म्हणून दिवसरात्र एक करून समाज बांधव संघटीत करून भविष्यातील अडचणी समाजातील जाणकार लोकांच्या कानावर घातल्या.

 त्यानुसार समाजातील मंडळी संघटीत झाली आणि बघताबघता ५२ गावे एकत्रित येऊन एक मोठा संकल्प केला तो म्हणजे रोहे शहरात वस्ती गृह निर्माण करण्याचा त्या करीता जागा मिळणे,संस्था रजिस्टर करणे वास्तु बांधने या सर्व करण्या करिता अर्थ व श्रमदान महत्त्वाचे होते.

रोहे तालुक्यातील ५२ गावातील खंबिर पाठींब्यामुळेच अवघड गोष्टी सोप्या होऊ लागल्या आणि विविध सहकारी संस्थचे सेक्रेटरी असलेल्या निरकरांनी सहकारी मंडळींना घेऊन आगरी ज्ञाती सेवा मंडळ,संस्था नोंदणी कायदा १८६० या अॅक्ट खाली मंडळ स्थापन केले.

त्या मंडळाचे मुळ फाऊंडेशन १) चांगदेव सहदेव निरकर हे संस्थापक/अध्यक्ष झाले तर २)नथुराम पोसू मांडलेकर,धोडखार.३) लक्ष्मण दगडू ठाकूर,वावेखार.४) चांगदेव हिराजी पाटील, दापोली.५) पांडूरंग गोविंद मोरे,रोठखुर्द.६) तुकाराम परसू डाकी,रोठबुद्रुक.७)यशवंत दामा घाग, कुभोशी.या कार्यकारिणीतून मंडळाची निर्मिती झाली.पुढे कै.निरकर यांचे पदभार रोहे तालुका ५२ गाव संस्थापक/अध्यक्ष,१३वर्षे रायगड जिल्हा परिषदेत सदस्य...,कोकबन येथे जे.बी.सावंत न्यू इंग्लिश स्कूल चे निर्माते..कोकबण येथील शासकीय उपआरोग्यसेवाकेंद्र(रुग्णालयात)बंद अवस्थेत होता तो लोक सहकारातून चालू केला.

चणेरा येथील सुडकोळी सहकारी सोसायटीच्या भात गिरणीचे संचालक म्हणून तर धोंडखार ग्रृप ग्राम पंचायत मध्ये सदस्य, आणि सेवा निवृत्त होईपर्यंत धोडखार ते न्हावे या विभागातील विविध सहकारी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम केले.तसेच गोफण ते साळाव विभागातील पहिले श्री समर्थ बैठकीचे श्रवण हाॅल धोडखार येथे होणे करीता मार्गदर्शक म्हणून लाभलेअसे त्यांच्या अनुयाई, श्री राज जोशी (महादेवखार) कडून सांगण्यात आले.कै.चांगदेव निरकर यांच्या कारकिर्दी उल्लेखनीय असुन त्यांनी समाज कार्य करत असताना कधीही स्वताचा सार्थ पाहिला नाही सदानकदा हरतमुख स्वभावाचे कै.निरकरबाबा यांच्या पच्छात पत्नी,दोन सुपूत्र जिवन व मनोहर,व एक मुलगी,सुना नातवंडे पतवंडे नातेवाईक, सगेसोयरे मित्रगणगोत,समाज बांधव असा मोठा परिवार असुन ते यह लोकांतून गेल्या वर्षी निर्वाण पावले.

.

Comments

Popular posts from this blog