कोलाड पोलिसांची धडक कारवाई, छापा टाकून गावठी दारू जप्त
गोवे-कोलाड (विश्वास निकम) पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी आंबेवाडी येथील कासा आदिवासी वाडी येथील सोमनाथ सुरेश जाधव वय वर्षे ४० यांच्या घराच्या मागे बांबूच्या बेटा जवळ मोकळ्या जागेवर १० लिटर गावठी दारूचा कॅन छापा टाकून जप्त केलाआहे.
या विषयी कोलाड पोस्टे गुरुनं ००८२/२०२१,६५ इतर ६प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा. एन. एस. पाटील,पो.ना.ऐ.बी पाटील, समिर कोकाटे अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment