Posts

Image
  रोहा वरसे ग्राम पंचायत कचरा डंपिंग ग्राउंड प्रश्न ऐरणीवर, लवकरात जागा उपलब्ध करून मिळावी रोहा तहसीलदार यांना दिले निवेदन! कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील कचरा डंपिंग समस्या गेली पंधरा दिवसांपासून मोठी अडचणीची ठरली आहे जागे अभावी घनकचरा कोठेही फेकता येत नसल्याने ही गंभीर समस्या ग्राम पंचायतीसमोर झाली असून शासनाकडून जागा उपलब्ध करून मिळावी याकरता सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायतीच्या वतीने रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायती हद्दीतील वाढती लोखंसंख्या पाहता दिवसेंदिवस घनकचऱ्यात देखील वाढ झाली आहे त्यामुळे शासनाकडून कचरा डंपिंग ग्राउंड याकरता जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच नरेशशेठ पाटील,उपसरपंच अमित मोहिते,रामाशेठ म्हात्रे ,सह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी रोहा तहसीलदार यांना निवेदन दिले व यासाठी मागणी केली आहे. सदरच्या निवेदनात ग्रामपंचायत वरचे हद्दीतील मौजे वरसे निवी भुवनेश्वर गावांची साधारणपणे लोकसंख्या 20000 आहे तरी दररोजचा कचरा एक ते दीड टन पेक्षा जास्त कचरा निघतो कचरा घंटागाडीमार्फत...
Image
  ओबीसी संघटना वाढीला बळ,तर अन्याया विरोधात लढा उभारणार:-सुरेश मगर यांचे रोह्यात रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा सभेत प्रतिपादन! कोलाड (श्याम लोखंडे) राज्यासह देशभरात ओबीसीचे संख्याबल अधिक आहे त्यामुळे ओबीसीला त्यानुसारच आरक्षण दिले गेले पाहिजे सन 1931 नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही त्यामुळे काहीसा हा ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणाऱ्या सोयी सुविधा या पासून वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील राजकीयदृष्ट्या पाहिले तर देशात बहुसंख्येने असलेला ओबीसी समाज हा राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे आर्थिक बळ नाही निवडणुकीत त्याला पुरेसा आरक्षण नसल्याने त्याची पिछेहाट होत आहे तर उच्च वर्णीय समाज त्याचा गैरवापर करत आहे त्यामुळे येत्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित गठित करून ओबीसी समाजाच्या वाढीवर भर देत त्यांना बळ देऊन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारला जाणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी रोहा येथील आयोजित केलेल्या जिल्हा कार्यक...
Image
  रोहिणी महाबळे यांचे अल्पशा आजाराने निधन कै. रोहिणी महाबळे   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)   रोहा तालुक्यातील पाले बु. येथील रहिवाशी रोहिणी गोविंद महाबळे यांचे बुधवार दि.२६/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्यांचे पती शिक्षक होते. परंतु ते अनेक वर्षे आजारी होते.परंतु त्यांनी न डगमगता पतिसेवा केली.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले कुटुंब संभाळले.    त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,जावई,दिर,जावा,पुतणे, नातवंडे व मोठा महाबळे कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.४ नोव्हेंबर तर उत्तर कार्य विधी रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहे.
Image
  पेणचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम  ९९.७०% गुण मिळविले स्वरूपवर अभिनंदनाचा वर्षाव! कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्या पेण तालुक्यातील व पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७०% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे तर याच्या या यशस्वीपणे कामगिरी बद्दल स्वरूपवर सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रायगड जिल्ह्यातील नामांकित व नावलौकिक असलेल्या लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग ( बाटू ) या कॉलेज मधुन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके ह्या विद्यार्थीने पदविका परीक्षेत तब्बल ९९.७०% मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची तसेच आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा अधिक उंचावत प्रकाशमान केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात स्वरूप ने उत्तमरीत्या यश प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. मधुकर दाभाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोणत्याह...
Image
  दिवाळी पहाट असंख्य दिव्यांनी उजळून निघाला अवचितगड शिवशंभु प्रतिष्ठाने ऐतिहासिक महत्त्व जपत केला दीपोत्सव  साजरा कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील गडसंवर्धनातील अग्रमानांकीत शिवशंभु प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अवचितगडावर दिवाळी पहाट निमित्ताने औचित्य साधून येथील शिवप्रेमी शिलेदारांनी व ३५० मावळ्यांच्या उपस्थितीत दिपावली पहाटचा ऐतिहासिक असा दिव्यांच्या ज्योत पेटवत दीपोत्सव कार्यक्रम करत मोठ्या उत्साहात साजरा केला तर संपूर्ण अवचितगड हा दिव्यांनी सजल्यानी उजळून निघाला होता .त्यामुले एक ऐतिहासिक स्वरूप याप्रसंगी या गडावर आल्याचे सर्वांना पहावयास मिळाले. शिव छञपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील अवचितगडावर शिवशंभु प्रतिष्ठान मार्फत गेली आठ वर्ष गडकोट संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जाते. त्याच सोबत पहिले तोरण गडाला या भावनेतून दसरा गडपुजन तथा पहिला दिवा गडकोटांच्या चरणी या भावनेने दिपावली पहाटचे आयोजन केले जाते. दिपावली पहाटचे औचित्य साधून या कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी शिलेदार युवक तरुण आवर्जून उपस्थित असतात. या राञी गडावर...
Image
  ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जातीनिहाय जनगणनासाठी रायगडात १० नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा निघणार! न्यायी हक्कासाठी,भावी पिढीच्या उत्कर्षासाठी हजारो समाज बांधव उपस्थित राहणार! कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही.त्यामुळे ओबीसीचे अपेक्षीत हक्क मिळणार नाही.यासाठी जातीनिहाय जनगणना ची मागणी घेत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातीनिहाय जनगणना सह अन्य मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा धडक मोर्चा काढणार असल्याचे रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा यांची जिल्हा कार्यकरणी बैठकीत ठरविण्यात आले. रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा या संघटनेची सभा नुकतीच शासकीय विश्रामगृह रोहा येथे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली यावेळी सर्व ओबीसी बांधव यांच्या समावेत ही घोषणा करण्यात आली आहे  यावेळी प्रमुख उपस्थितीत ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाव...
Image
  आनंदाच्या दिवाळीचा शिधा किट आधारभूत धारकांना पोहचलेच नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांसह धारक प्रतीक्षेत!   देता येत नसेल तर फुशारक्या  मारायच्या कशाला?   शिधा धारकांचा सरकारला सवाल! कोलाड (श्याम लोखंडे) राज्य सरकारने ऐन दिवाळी तोंडावर येताच तसेच  राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त स्वरूपात व फक्त १०० रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी शिधापत्रिका धारकांना  याचा फायदा होईल असं सांगण्यात आलं. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचं याकरिता कंत्राट देखील देण्यात आलं. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना देखील हा आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत ऐन दोन दिवस दिवाळीला शिल्लक असून काळ रविवारपर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेला नाही तर रेशन धान्य दुकानदाराने यासाठी पैशाचा देखील भरणा शासनाकडे भरला त्यामुळे धान्य दुकानदारांसह रेशन धारकही या आनंदाच्या शिधा किटकडे डोळे लावून बसले आहेत. दिवाळीला एक दोन दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यात राज्य सरकाने जा...