उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या   माणगांव पोलीसांचा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून सन्मान 

 सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव!

  कोलाड (विश्वास निकम) रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी माहे जुलै २०२५ रोजी चोरीला गेलेला माल तपासाच्या आधारे जप्त केल्यामुळे उत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार तसेच ऑगस्ट २०२५ रोजी माणगांव पोलिसांनी आरोपीला अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला या बद्दल माणगांव पोलीस यांना जिल्हा अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी उत्कृष्ट तपास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    जुलै २०२५ मध्ये माणगांव पोलीस ठाणे यांच्या तांत्रिक विश्लेषण व वैज्ञानिक तपासाच्या आधारे माणगांव पोलीस ठाणे गु. र. नं.  ४३/२०२५भा.न्या.स.२०२३चे कलम ३३१(१)(२),३०५(अ),३२४(४),३२४(५), या गुन्हयातील आरोपीत यांस अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेला ३३, १०,०००रुपयांचा माल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आला या बद्दल पोनि निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे, सपोनि बी.के. जाधव,पोसई एस. एस. घुगे,पोहवा एस एन. फडताडे, पोहवा पि. के. घोडके, पोशि आर.पी. शिर्के, पोशि एस यु. मुंडे यांना उत्कृष्ट मलामत्ता हस्तगत पुरस्कार देण्यात आला.

    तसेच  ऑगस्ट २०२५ मध्ये माणगांव पोलीस ठाणे यांच्या तांत्रिक विश्लेषण व वैज्ञानिक तपासाच्या आधारे माणगांव पोलीस ठाणे गु.र. नं. ९८/२०२५भा. न्या. स. २०२३ चे कलम १०३(१)३११,३३३या गुन्हयातील आरोपीत यांस अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पो.नि. श्री निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे,सपोनि भैरू किसन जाधव, पोहवा राजेंद्र रामचंद्र भोनकर, पोहवा सूरज नरेश फडताडे, पोहवा प्रदिप केरबा घोडके,पोशि राकेश पांडुरंग शिर्के, पोशि सुग्रीव उद्धवराव मुंडे, पोशि विकास शिवाजी कांबळे पोशि विनय चंद्रकांत पाटील यांना रायगड जिल्हा अधीक्षक आंचल दलाल यांच्या तर्फे उत्कृष्ट तपास पुरस्कार देण्यात आला.यानंतर ही असेच कार्य तुमच्याकडून घडत राहो असे सांगण्यात आले.

माणगाव पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच पोलीस अधीक्षकांनी केलेल्या सन्मानाबाबत  माणगाव पोलिसांवर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Comments

Popular posts from this blog