बॅसिलिक फ्लाय स्टुडिओजचे ग्रामीण भागातील कार्य कौतुकास्पद : सुरेश मगर
रोहा (प्रतिनिधी)महादेववाडी येथील प्रियंका गुरव या पुणे येथे आयटी कंपनीत कामासाठी गेले असताना सुद्धा त्यांचे आपल्या गावाकडची ओढ पाहता सामाजिक जाणीव यातून आपले उत्तरदायित्व दाखवत महादेववाडी शाळेतील विद्यार्थ्यांना बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज पुणे कंपनीच्या माध्यमातून क्रीडा व शालेय साहित्य सी.एस.फ माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. शहरात आयटी कंपनीच्या माध्यमातून ॲनिमेशन चे काम करणारे बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज चेन्नई आणि पुणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असे साहित्य क्रीडा व शालेय साहित्य दिल्याने विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा होईल असे सांगत कंपनीचे ग्रामीण भागातील सी एस एफ माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर यांनी व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील आय एस ओ जिल्हा परिषद शाळा महादेववाडी येथे बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज चेन्नई आणि पुणे यांच्या वतीने क्रीडा व शालेय साहित्य विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यासह कचराकुंडी बांधण्यासाठी निधी देण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी सुरेश मगर बोलत होते.
यावेळी उपसरपंच अरविंद मगर,बॅसिलिक फ्लाय स्टुडिओज चेन्नई आणि पुणे.डायरेक्टर बालकृष्णन आर,लक्ष्मी सुंदरम,हेड ऑफ स्टुडिओ प्रभाकर दुर्रस्वामी,हेड ऑफ आयटी दिनेश रोकडे,हेड ऑफ एच आर प्रियांका गुरव,सुपरवायझर जानवी मेस्त्री,एच आर प्रताप शिंदे,आयटी मॅनेजरअनिश कुरूप,प्रीप सुपरवायझर रामप्रसाद पुली, प्रीप लीड धनंजय हजारे,व्हीएफएक्स रोटो टीम लीड,शिवाजी बालवे, कामगार नेते संदीप मगर, केंद्रप्रमुख नारायण गायकर, प्रज्योत गुरव, गणेश सुतार, निलेश सुतार, सुनील सुतार, जितेंद्र जाधव, राजू सुतार, रोहित मगर,पुजा गुरव आदीसह शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना उपस्थित आयटी कंपनीचे संचालक व अधिकारी यांनी कंपनी ॲनिमेशन मध्ये काम करत असून या संबंधित सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
Comments
Post a Comment