रोहा तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत ऐनघर येथील सरपंच, सदस्य,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे ग्रामविकास मंत्री यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही गुन्हा दाखल नाही! 

 ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील तरुण २२ फेब्रुवारी २०२३ रोजी करणार लाक्षणिक उपोषण!   

      ग्रामपंचायत अपहार प्रकरणी अभय देणारा कोलाड विभागातील मोठा पुढारी कोण? सर्वत्र चर्चेला उधाण.....

रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचा पाठिंबा!

  रायगड (विशेष प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निधी अपहार प्रकरणी कारवाईबाबत ग्राम विकास मंत्रींनी आदेश देऊनही कोणतीच  कारवाई न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील युवकांनी 22 फेब्रुवारी रोजी रोहा पंचायत समितीसमोर  लक्षणिक उपोषण करणार असल्याचे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना दिलेअसून या निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, पोलीस अधीक्षक रायगड, कार्यकारी अधिकारी रा.जि.प. अलिबाग, उपकार्यकारी अधिकारी रा.जि.प.अलिबाग (ग्रामपंचायत विभाग) उपविभागीय अधिकारी रोहा, तहसीलदार रोहा, पोलीस निरीक्षक रोहा, रोहा पंचायत समिती, यांना  निवेदन दिले आहेत.

याबाबत पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिनेश देवराम कातकरी व त्यांचे सहकारी महादेव मोहिते, चिंतू पवार, धर्मेंद्र शिद, प्रफुल्ल कनघरे  मंगेश लाड, यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की आम्ही ऐनघर ग्राम पंचायती मध्ये झालेल्या अपहाराबाबत विभागीय आयुक्त, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे १४/१/२०२० व २१/५/२०२० व २७/५/२०२० व ३/९/२०२० व २४/९/२०२० रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेले होते. सदरचे अर्ज तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग (रा.जि.प. अलिबाग) यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे चौकशीसाठी पाठविले होते. त्यामुळे त्यांनी ४/३/२०२० रोजी चौकशी अधिकारी जी.एल. वायाळ यांची नेमणूक करत वायाळ साहेब यांनी गेली वर्षभर ऐनघर ग्रामपंचायत मध्ये अपहार झाल्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग (रा.जि.प अलिबाग) यांच्याकडे पाठविला होता. सदरचे चौकशी अहवालामध्ये निश्चित केलेली अपहाराची रक्कम ३४ लाख,३४ हजार,७१३ रुपये नियमबाह्य खर्च करून अपहार केलेला आहे असे नमूद केलेले होते. तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी अनिकेत पाटील साहेब (पंचायत समिती,रोहा) यांनी दिनांक २३/३/२०२२ रोजी ९०लाख,२३ हजार,७००रुपये अनियमितपणे खर्च केल्याचा अहवाल पाठविलेला होता. सदर अहवालांवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (रा.जि.प अलिबाग) यांचे दालनात सुनावणी होऊन पुढील कार्रवाईसाठी मा.विभागीय आयुक्त,कोकण भवन,नवी मुंबई यांसकडे चौकशी करून चौकशी अहवाल पाठविलेला होता सदर अहवालावर मा.विभागीय आयुक्त,कोकण भवन,नवी मुंबई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेऊन ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे आणि शासन शुद्धिपत्रक १८ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्रवाई करावी असा आदेश १९/१०/२०२२ रोजी पारित केलेला होता. मात्र सदरच्या १९/१०/२०२२ रोजीच्या आदेशाविरुद्ध मा. ग्रामविकास मंत्री यांच्याकडे ४/११/२०२२ रोजी अपील दाखल केलेला असून सदर अपीलाची सुनावणी मा.ग्रामविकास मंत्री यांनी १४/११/२०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित केलेली होती. यावेळी मा. ग्रामविकास मंत्री यांनी सुनावणी करत १९/१०/२०२२ रोजीचा मा. विभागीय आयुक्त,कोकण भवन, नवी मुंबई,यांचा आदेश १६/१/२०२३ रोजी कायम केलेला आहे. ‌ परंतु शासन निर्णय ४ जानेवारी २०१७ च्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत तत्कालीन सरपंच व सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचेवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. तो गटविकास अधिकारी यांनी करणे क्रमप्राप्त आहे. तसेच अधिकारी वर्गावर निलंबनाची कार्रवाई झालेली दिसत नाही व संबंधित अपहाराची रक्कम वसूल करणेबाबत कोणतीही कार्रवाई झालेली दिसत नाही तसेच आज प्रत्यक्षात काम करीत असणारे सदस्य यांचेवर ३९(१) ची कोणतीही कारवाई केल्याची दिसून येत नाही. म्हणून आम्ही दिनांक २२/२/२०२३ रोजी वेळ सकाळी ११:०० ते५:०० वाजेपर्यंत, पंचायत समिती कार्यालय रोहा जिल्हा रायगड यांचे आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. ‌‌ कळावे,आपले विश्वासू, ‌दिनेश देवराम कातकरी,महादेव गणपत मोहिते, चिंतू रामू पवार,धर्मेंद्र ताया शिद,प्रफुल पांडुरंग कणघरे,मंगेश देवराम लाड या सर्वांत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

 मात्र ग्रामपंचायत  आदेश येऊनी सदरील सदस्यांवर कोणताच गुन्हा दाखल न केल्याने रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तर्क वितर्क लढवले जात असून या अपहरण प्रकरणी कोलाड मधील बडा पुढारी कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क केली जात आहे आहेत जात असून या उपोषणाबाबत आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या अन्यायाविरोधात लढाऊ संघटना म्हणून  प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेने सुद्धा पाठिंबा दिला असून सदरील निधी अपहार  करणाऱ्यांवर  गुन्हा दाखल न झाल्यास सदरील प्रकरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog