पृथ्वीचा संतुलन ठेवायचा असेल तर एक झाड लावा व लेकी वाचवा:-ह.भ.प.संजीवनीताई शिंदे
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण)१९८० च्या दशकात मुलीकडून हुंडा म्हणून रेडिओ मागितली जात असे तर १९९०च्या दशकात हुंडा म्हणून मुलीकडून टुव्हिलर मागतली जात होती परंतु २०१० च्या दशकात हुंडा म्हणून मुलीकडून फोरव्हिलर गाडी मागितली जात होती परंतु २०२० च्या दशकात मुलीची गर्भाशयातच स्त्रीभून हत्या झाल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे यामुळे या दशकात लग्नासाठी लग्न करण्यासाठी मुलगी मिळत नसल्याने तुम्ही फक्त मुलगी द्या बाकी खर्च आम्ही करू अशी बोलण्याची वेळ आली आहे.त्याच प्रमाणे दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पृथ्वीचा संतुलन बिघडत चालला आहे यासाठी पृथ्वीचा संतुलन ठेवण्यासाठी एक झाड लावा व लेकी वाचवा असे मत ह. भ.प.संजीवनीताई शिंदे यांनी पुगांव येथील आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.
तसेच ज्याचा स्वभाव भोळा आहे तो कितीही मोठा झाला तरी तो बदलत नाही हे शिव भोळा चक्रवती l त्याचे पाय माझे चित्ती ll वाचे वदता शिवनाम l तया न बाधी क्रोधकाम ll धर्म अर्थ काम मोक्ष l शिव देखता प्रत्यक्ष l एका जनार्दनी शिव l निवारी कळीकाळाचा भेव ll हे संत एकनाथ महाराजांचा अभंगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.संजीवनी महाराज शिंदे यांनी व्यक्त करतांना सांगितले कि एक भिकारीन सुया,काळे मणी, आरसे व इतर वस्तू घेऊन विकण्यासाठी जात असे तिच्या सोबत तीची लहान मुलगी दुडूदुडु चालत जात होती.आई म्हातारी झाल्या नंतर तेच काम तीची मुलगी करू लागली. मुलगी अतिशय सुंदर होती.तिला शिकारी साठी त्या बाजूनी जंगलात जाणाऱ्या राजाच्या मुलांनी पहिली व तिला विचारले कि तु कोणाची मुलगी आहेस त्यावर तीने उत्तर दिले कि तुम्हाला केस विचारण्यासाठी फणी पाहिजे काय? तिच्या जवळ बोलण्यात काय अर्थ नसल्याने नंतर राजाच्या मुलगा तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी त्या मुलीच्या घरी गेला व लग्न ही जमले लग्न झाल्यानंतर वरात राजाच्या दरबारी गेली तेथे तिला नाव घेण्यास सांगितले तेव्हा तिने नाव घेतले कि इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय हरिचंद्र पाटलांचे नाव घेते भाकर वाढ ग माय! यावरून माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा स्वभाव बदलत नाही.त्यामुळे शिव शिव नामाचा मंत्राचा जप केल्यावर धर्म,अर्थ, काम मोक्ष प्राप्त होते.
यावेळी गायनाचार्य रविंद्र मरवडे,भाई देवकर, गणेश दिघे,सुनिल भऊर,मृदूंगमणी ज्ञानेश्वर दळवी, कृष्णा शिंदे, राधिका ताई,रोहित धनवी,ह.भ.प.आंबेकर महाराज,कोलाड-खांब पंचक्रोशीतील असंख्य नागरिक,समस्त पुगांव ग्रामस्थ,तरुण वर्ग,महिला वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment