महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरीय वेंगुर्ला येथे अधिवेशन,

 रायगडातील सर्व शिक्षकांनी अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन! 

रायगड (प्रतिनिधी)"न्यायाची चाड अन्यायाची चीड" हे ब्रीद घेऊन 1962 पासून राज्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षणाचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कार्यरत आहे या संघटनेचे सतरावे त्रैवार्षिक महा अधिवेशन 15 व 16 फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला  येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष  राजेश जाधव व सरचिटणीस विजय येलवे यांनी माहिती  दिली.

 1960 च्या दशकात विद्यार्थी शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या विद्यावेतनाच्या प्रश्न गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी भा.वा.शिंपी( नाशिक)वि.भा. येवले (सोलापूर ) रॉबिन हेंड्रिंग्ज अशा कार्यकर्त्यांनी राज्यातील हजारो छात्र शिक्षकांना सोबत घेऊन मोठा लढा उभारला पुण्यातील शनिवार वाड्यासमोर झालेल्या आमरण उपोषणाला राज्यातील तत्कालीन अनेक समाजवादी व डाव्या चळवळीतील नेत्यांनी हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राज्य सरकारने नरमाईची   भूमिका घेत विद्यावेतनात पुरेशी वाढ केली पुढे या चळवळीचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेत रुपांतर झाले.

 महाराष्ट्रातील प्रख्यात विद्वान दत्तो वामन पोतदार यांनी शिक्षक समितीचे पहिले राज्यध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली तर वि.भा.येलवे यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

22 जुलै 1962 पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक तालुक्यात शिक्षक समितीचे जाळे विणले केले असून वाडी वस्तीपर्यंत ही चळवळ पोहोचली.

16 फेब्रुवारी रोजी खुले अधिवेशन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र उपस्थित राहणार आहेत ते अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे धुरा सांभाळत असून अध्यक्षस्थान राज्याध्यक्ष उदय शिंदे भूषवणार आहेत.

 मागील साठ वर्षात शिक्षक समितीने प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य  प्राप्त व्हावे   या उद्दिष्टेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यकर्त्यांकडून करवून घेण्यात यश मिळवले आहे 1977 साली झालेल्या 54 दिवसाच्या संपात शेवटपर्यंत भागीदारी केल्याने संघर्ष करणारे एकमेव शिक्षक संघटना म्हणून शिक्षक समितीने लौकिक मिळवला आहे या यशस्वी लढ्यामुळेच आजही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई व वेतन भत्ते मिळवून दिले आहेत.

 शिक्षक समितीच्या मागील 16 राज्य अधिवेशनातून संघटनेची ताकद अधोरेखित झाली असून याच बळावर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या पर्यटन स्थळे हे विराट महा अधिवेशन संपन्न होणार असून दिनांक 16फेब्रुवारी रोजी राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद संपन्न होणार असून शिक्षणाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, याविषयी सखोल चिंतन होणार असून विविध ठराव  प्रारीत होणार आहेत.

 राज्याच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रभावी प्रश्नांची तीव्रता राज्यकर्त्यांपुढे  ताकदीने मांडून सोडवणूक करून घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन  शिक्षक समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेश जाधव व सरचिटणीस विजय येलवे यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog