शिवतेज मित्रमंडळ आमडोशी आयोजित कबड्डी स्पर्धेत चोंडेश्वरी कडसुरे संघ विजेता

   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण) शिवतेज मित्रमंडळ आमडोशी यांच्या विद्यमानाने शनिवार  १८ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा व नागोठणे विभाग कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात चोंडेश्वरी कडसुरे संघाने जय हनुमान आमडोशी संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर जय हनुमान आमडोशी संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरला.तसेच शिवशंकर वांगणी संघ तृतीय तर  वरदायनी कोंडगाव संघ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू दिवेश महाडिक,उत्कृष्ट खेळाडू हरेश भोसले, उत्कृष्ट पक्कड प्रणित तेलंगे, तर पब्लिक हिरो प्रणय शिंदे यांना देण्यात आले.

    कबड्डी स्पर्धेचे उद्धघाटन वांगणी ग्रामपंचायत सरपंच सोनम भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले,उपसरपंच सुनिता जांबेकर, माजी उपसरपंच लहू तेलंगे,एकनाथ ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जांबेकर,नरेश दळवी,एकनाथ दळवी, मोरेश्वर तेलंगे,वर्षा जांबेकर सर्व कबड्डी यशश्विकरण्यासाठी शिवतेज मित्रमंडळ आमडोशी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog