ऐनघर ग्रामपंचायतीच्या अपहाराबाबत ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा अंतिम निर्णय होऊन देखील न्याय मिळण्यास विलंब होत असल्याकारणाने अखेर ऐनघर हद्दीतील ग्रामस्थांनी केले एक दिवशीय लाक्षणिक उपोषण!

   आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढू :- बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष-दिनेश कातकरी


कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर मध्ये २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये घडलेल्या अपहाराचे बाबतीत अंतिम निकाल सन्माननीय. ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांनी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्यास व पुढील कार्रवाई करण्यास विलंब करीत असल्याकारणाने तसेच पुढील कार्रवाईस होणारे विलंबाचे कारण लक्षात येत नसल्याकारणाने आणि आज प्रत्यक्षात काम करीत असणारे सदस्य यांच्यावर त्वरित ३९(१) ची कार्रवाई व्हावी याकरिता ऐनघर पंचक्रोशी हद्दीतील ग्रामस्थ आणि ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते यांनी मंगळवार दि.२२/२/२०२३ रोजी पंचायत समिती रोहा यांचे कार्यालयाचे आवारात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण पुकारला होता. सदरच्या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशाचे पालन करून तसेच प्रस्तुत प्रकरणी जबाबदारी निश्चित झाल्यानंतर सन्माननीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुंबई यांच्या निकालाप्रमाणे कारवाई करण्याची दक्षता पंचायत समिती रोहा या कार्यालयाकडून घेण्यात येईल तरी सदर उपोषण मागे घेऊन उपोषणास बसू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र संबंधित उपोषणकर्त्यांना देण्यात आलेले होते. मात्र सदरच्या विषयी होणारा विलंब हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगत अखेर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण २२फेब्रुवारी २०२३ रोजी करत सायंकाळी ५ वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली.

ऐनघर ग्राम पंचायती मध्ये झालेल्या अपहाराबाबत विभागीय आयुक्त, कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे १४/१/२०२० व २१/५/२०२० व २७/५/२०२० व ३/९/२०२० व २४/९/२०२० रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेले होते. सदरचे अर्ज तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग (रा.जि.प. अलिबाग) यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना दिले आहे ४/३/२०२० रोजी चौकशी अधिकारी जी.एल. वायाळ यांची नेमणूक करत वायाळ साहेब यांनी गेली वर्षभर ऐनघर ग्रामपंचायत मध्ये अपहार झाल्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग (रा.जि.प अलिबाग) यांच्याकडे पाठविला होता. सदरचे चौकशी अहवालामध्ये निश्चित केलेली अपहाराची रक्कम ३४ लाख,३४ हजार,७१३ रुपये नियमबाह्य खर्च करून अपहार केलेला आहे असे नमूद केलेले होते. तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी अनिकेत पाटील साहेब (पंचायत समिती,रोहा) यांनी दिनांक २३/३/२०२२ रोजी ९०लाख,२३ हजार,७००रुपये अनियमितपणे खर्च केल्याचा अहवाल पाठविलेला होता. सदर अहवालांवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (रा.जि.प अलिबाग) यांचे दालनात सुनावणी होऊन पुढील कार्रवाईसाठी मा.विभागीय आयुक्त,कोकण भवन,नवी मुंबई यांसकडे चौकशी करून चौकशी अहवाल पाठविलेला होता.

तद्नंतर सदर अहवालावर मा.विभागीय आयुक्त,कोकण भवन,नवी मुंबई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेऊन ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे आणि शासन शुद्धिपत्रक १८ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्रवाई करावी असा आदेश १९/१०/२०२२ रोजी पारित केलेला होता. मात्र सदरच्या १९/१०/२०२२ रोजीच्या आदेशाविरुद्ध मा. ग्रामविकास मंत्री यांच्याकडे ४/११/२०२२ रोजी अपील दाखल केलेला असून सदर अपीलाची सुनावणी मा.ग्रामविकास मंत्री यांनी १४/११/२०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित केलेली होती. यावेळी मा. ग्रामविकास मंत्री यांनी सुनावणी करत १९/१०/२०२२ रोजीचा मा. विभागीय आयुक्त,कोकण भवन, नवी मुंबई,यांचा आदेश १६/१/२०२३ रोजी कायम केलेला आहे. ‌ परंतु शासन निर्णय ४ जानेवारी २०१७ च्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत तत्कालीन सरपंच व सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचेवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. तो गटविकास अधिकारी यांनी करणे क्रमप्राप्त आहे. तसेच अधिकारी वर्गावर निलंबनाची कार्रवाई  झालेली दिसत नाही व संबंधित अपहाराची रक्कम वसूल करणेबाबत कोणतीही कार्रवाई झालेली दिसत नाही तसेच आज प्रत्यक्षात काम करीत असणारे सदस्य यांचेवर ३९(१) ची कोणतीही कार्रवाई केल्याची दिसून येत नाही. म्हणून आम्ही दिनांक २२/२/२०२३ रोजी वेळ सकाळी ११:०० ते५:०० वाजेपर्यंत, आज पंचायत समिती कार्यालय रोहा जिल्हा रायगड यांचे आवारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत असे उपोषण करताना उपोषण नोटीसीमध्ये नमूद केलेले होते. त्याचप्रमाणे उपोषणकर्त्यांनी भेट दिलेल्या पत्रकारांना पुढे असे सांगितले की आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होणार असेल तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत.

सदरचा अपहार मोठा असून अधिकारी वर्ग कार्रवाई करण्यासाठी विलंब करीत आहेत असा भेदभाव का? असा प्रश्न ऐनघर हद्दीतील सर्व सामान्य नागरिकांना पडला असल्याचे उपोषणकर्त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. सदरच्या उपोषणास सामान्य नागरिकांना वाली म्हणून बसलेले ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते  व सहकार्य देण्यासाठी उपस्थित असलेले ऐनघर हद्दीतील ग्रामस्थ पुढील प्रमाणे उपस्थित होते- दिनेश देवराम कातकरी,धर्मा शेठ ,प्रफुल्ल कणघरे,निलेश साळवी,चिंतु शेठ पवार,मंगेश लाड,दिनेश कदम, चेतन मोहिते,संजोग अवसरे

तसेच यावेळी आवर्जून सामान्यांच्या लढ्यासाठी भेट देणारे डॉ. श्याम लोखंडे (पत्रकार), सामाजिक कार्यकर्ते  संतोष कोंडे, सामाजीक कार्यकर्ते -माजी सरपंच.नरेंद्र हरिभाऊ पवार ( गोवे) सतिश सुटे ( सामाजीक कार्यकर्ते), दत्तात्रय तेलंगे  नवनाथ बर्जे ( बेरोजगार संघटना कार्यकर्ते) आणि रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते भिवा पवार एकलव्य आदिवासी संघटना माणगाव तालुका अध्यक्ष उमेश जाधव, उपाध्यक्ष बबन कोळी, एकलव्यआदिवासी संघटना निजामपूर अध्यक्ष वनमित्र राम कोळी, गंगाराम वाघमारे व रोहा शहरातील पञकार इत्यादींनी या लाक्षणिक उपोषणास आवर्जून भेट दिली व माहिती जाणून घेतली.

प्रतिक्रिया :-गेली सहा महिन्यांपासून रोहा पं समिती येथील कार्यभार पाहत आहे तसेच या ग्रामस्थांच्या समस्येवर गेली तीन चार वर्षाचा कालावधी लोटला गेला आहे. सदरच्या अपहार प्रकरणी अपहार रक्कम  निश्चित करण्यासाठी एक ते दोन महिन्याचा कालावधी लागणार असून अपहार रक्कम निश्चित झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवार्ई केली जाईल- रोहा पंचायत समिती गट विकास अधिकारी(गट-अ) शुभदा पाटील 

Comments

Popular posts from this blog