चिंचवली येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भोसले यांचे निधन!

कै. तुकाराम बाबू भोसले 

 रायगड (प्रतिनिधी)रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील सामाजिक कार्यकर्ते कै तुकाराम बाबू भोसले यांचे अल्पशा आजाराने 9 मे रोजी निधन झाले मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते.

 परिसरातील एक सुजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते नेहमी शांत संयमी हसतमुख चेहरा असायचा ते नेहमी गोरगरीब आदिवासी समाजाच्या मदतीसाठी धावून जायचे. त्यांना समाजकार्याची आवड होती. गावातील कोणत्याही शुभ कार्यात ते नेहमी पुढे असायचे. 

 कै.तुकाराम भोसले हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी काही वर्षे मुंबईतही नोकरी केली. ते अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे होते. प्रामाणिकपणे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा मुलांचा सांभाळ करत मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वत्र दुःख होत आहे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे अंत्यविधीसाठी नातलग, हितचिंतक, सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील असंख्य नागरिक तसेच समस्त चिंचवली ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. त्यांचा मुलगा सुधीर भोसले हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सामाजिक कार्यकर्ते व असंख्य मान्यवरांनी चिंचवली येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. त्यांची दसपिंड विधी 18मे बुधवार रोजी होणारअसून  उत्तरकार्य 20 मे शुक्रवार रोजी चिंचवली या राहत्या घरी होणार असून कीर्तनकार ह.भ.प. श्री नंदकुमार महाराज तेलंगे यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केले असून त्यांना साथ करी कोलाड विभाग वारकरी संप्रदाय आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सुन, नातवंडे, असा परिवार आहे. कै.तुकाराम भोसले यांच्या आकस्मित निधनाने चिंचवली परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या दुःखात भोसले परिवार, चिंचवली ग्रामस्थ, जय भवानी क्रीडा मंडळ चिंचवली, व परिसरातील नागरिक सहभागी असून त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog