पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेला महिसदरा पुलावरील रस्त्याला जीवघेणे खड्डे!

 प्रशासन पाहतोय कोणाच्यातरी मृत्यूची वाट?

      गोवे-कोलाड (विश्वास निकम )पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला छोटासा पूल आहे. या पुलाच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असून हे जीवघेणे खड्डे अत्यंत धोकादायक असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांच्या जीवाशी खेळणारे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना जीव वाचवून तेथून मार्ग काढावा लागत असल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासन कोणाच्या तरी मृत्यूची वाट तर पाहत नाही अशी खंत राष्ट्रीय छावा  संघटना दक्षिण रायगड कार्याध्यक्ष तथा  समाजसेवक निलेशभाई महाडीक यांनी पत्रकारांशी व्यक्त केली.

               खड्ड्यांच्या याबाबतीत रायगड जिल्हा अग्रेसर आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गावर असलेले हे खड्डे बळी घेण्याची वाट पाहत आहेत काय ? असा ज्वलंत प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुई येथील समाजसेवक श्री. निलेशभाई महाडिक यांनी पत्रकारांना सांगितले मुंबई महामार्गावरील हे रस्ते आहेत की खड्ड्यातील रस्ते असा ज्वलंत प्रश्न दरवर्षी रस्त्यावर जे जीवघेणे खड्डे पडतात याला कोणीही जाब विचारत नाही. एकतर पनवेल ते इंदापूर रस्ता रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे त्यात हे जीवघेणे खड्डे असे किती वर्षे चालणार ? किती जणांचे बळी घेणार असे सांगून श्री. निलेश महाडिक म्हणाले की रस्त्यांबाबत सुधारणा न झाल्यास मी स्वतः माझ्या सहकार्या समवेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करून उपोषणास बसेन. या बाबत तह‌सिलदार जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देऊन आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.


          वास्तविक दहा मिटर पर्यंत पडलेले भलेमोठे खड्डे बुजविण्यास किती वेळ लागणार आहे. मात्र त्याच खड्ड्यात जीव जाण्यास फारसा वेळ लागणार नाही. या जीवघेण्या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, तसेच वाहन चालकांना दररोज मोठा त्रास सहन करून रस्ता पार करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog