उस्मानाबाद येथील सराईत भामट्याने कोलाड जवळील  सुतारवाडीत येऊन 3 लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालून फरार झाला


    गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड जवळील सुतारवाडी नाक्यावर एक भामटा आला, काही दिवस तेथे वास्तव्य केले अनेकांना आपल्या गोडवाणीने आपल्या जाळ्यात अडकविले आणि लाखो रुपये तसेच किराणा माल घेवून कोणासही थांगपत्ता न लागता या सराईत भामट्याने दूसरे ठिकाण गाठल्याने या ठिकाणी चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत अज्ञात इसमाबाबत संबंधितांनी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

                याबाबत अधिक माहिती अशी सुतारवाडी नाक्यावर एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी भाड्याने खोली घेवुन वास्तव्य करत होती. तेथे वास्तव्यास आल्यानंतर त्याने अधिक विश्वास संपादन करण्यासाठी सुतारवाडी येथे सत्यनारायणाची पुजा घालून पूजेसाठी अनेकांना निमंत्रण ही दिले होते. त्यावेळी त्यांने अनेकांची मने जिंकली आणि भूलथापाना अनेकांना आपल्या जाळ्यात अडकविले मी पुणे जिल्हयाचा सर्वेक्षण अधिकारी आहे. रायगड जिल्हयात दोन लेखनिकाच्या जागा रिक्त आहेत त्या भरावयाच्या आहेत त्यासाठी रु. २ लाख दिले तर काम नक्की होईल असे सांगून एका व्यक्तीकडून २ लाख रुपये उकळले. एवढेच नाही तर एका दुकानदारा कडून १ लाख ६२ हजार रुपयांचा किराना सामान आणि रोख रक्कम घेवून सुतारवाडी येथून पलायन केले.        

               हा भामटा उस्मानाबाद येथील असल्याचे समजते. नोकरीचे अमिष दाखवत या जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात नंतर तेथून आणखी कोठे तरी जावून तिथे आपल्या मधुर वाणीने गंडा घालणे असे सर्रासपणे प्रकार सध्या ठिक ठिकाणी सुरु आहेत . बेकारीमुळे अनेकांना नोकऱ्या नाहीत. याचा फायदा सराईत भामटे घेत आहेत. अशांच्या मुसक्या आवळून त्यांना योग्य ती शिक्षा ठोठावली पाहिजे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांची रक्कम त्यांना मिळवून दिली तर ज्याने व्याजाने रक्कम काढून नोकरीसाठी दिली असेल तर त्या व्यक्तीस दिलासा मिळेल. मात्र सुतारवाडीत येऊन भोळ्या भाबड्या माणसांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीची चर्चा नाक्यावर खंमगपणे चालू आहे. अनोळखी व्यक्तीवर कोणीही लगेच विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे .

Comments

Popular posts from this blog