रोहा अष्टमी येथील कब्रस्थान परीसरात आढळले एक दिवसाचे बेवारस अर्भक जिल्ह्यात एकच खळबळ ,
कोलाड : (श्याम लोखंडे ) रोहा शहरात अष्टमी येथील कब्रस्थान परीसरात एक दिवसाचे बेवारस बाळ मिळाले आहे. नवजात अर्भक बेवारस स्थितीत मिळाल्याने रोहा शहरासह रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
निर्दयी मातेने आपल्या बाळाला झाडीझुडपात फेकून दिल्याची दुर्दैवी घटना रोहा अष्टमी येथे घडली असल्याने खळबळ माजली असून
रोहा काब्रस्थानजवळ झाडाझुडपात एक दिवसाचे हे नवजात अर्भक कोणी टाकले याचा शोध पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस घेत आहेत.
अष्टमी परीसरात पुरुष जातीचा एक दिवसाचा नवजात अर्भक मिळाल्याची चर्चा या परीसरात वाऱ्यसारखी पसरली त्या अर्भकाला पाहण्यासाठी गर्दी केली. एक दिवसाचे हे अर्भक असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. निर्दयी मातापित्याने नवजात बालकाला मरण्यासाठी असे का फेकून दीले, माता तू कशी झालीस वैरीण अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. पोलिस निरीक्षक संजय पाटील याचा सखोल तपास करत आहेत ,बालकाला अधीक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment