Posts

Image
  नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न!    डंबेल्स,कवायत,थरार प्रात्यक्षिक तर,     विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्याने जिकंली कल्याणकरांची  मने!      कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित नवजीवन विद्यामंदिर कल्याण व शिशू रंजन प्राथमिक विद्यालय कल्याण यांच्या विद्यमाने नुकताच भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.   या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते. या वेळी प्रकाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर विद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच  कार्यक्रमाचे प्रमुख  प्रकाश पाटील यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप  प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी नवजीवन विद्यालयातील विद्यार्थी  व शिशुरंजन प्राथ...
Image
  कोलाड हायस्कूलमधील  माजी विद्यार्थ्यांचा  महामेळावा!     मेळा व्यात होणार अनेक  गुरुजनांचा सत्कार!      कोलाड (विश्वास निकम ) सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कोलाड हायस्कूल कोलाड मधील इयत्ता १० वी मधील सन १९८१ ते २००५ पर्यंत शिक्षण घेऊन गेलेल्या असंख्य विद्यार्थ्याचा महामेळावा रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.     ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करीत आहोत याचा मुख्य श्रेय या कालावधीत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षक वर्ग यांना जात असुन यामध्ये कर्मचारी वर्गाचा सहकार्य मोठा होता याची जाणीव ठेऊन साधारण ३२ सेवानिवृत्त शिक्षक व १३ कर्मचारी वृंद यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.     या कार्यक्रमासाठी डॉ.किशोर देशमुख तहसीलदार रोहा,श्री.रविंद्र दौंडकर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा,श्री.संजय धुमाळ सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक ( राष्ट्रपती पद...
Image
  नवजीवन विद्यामंदिर कल्याण येथे संविधान दिन उत्साहात संपन्न संविधान जनजागृती रॅलीने जिंकली कल्याणकरांची मने!       संविधान दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन कल्याण (प्रतिनिधी ) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित  नवजीवन विद्यामंदिर कल्याण   व शिशुरंजन प्राथमिक शाळा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रथमता कल्याण शहरात विद्यार्थ्यांची संविधान जनजागृती पर रॅली काढण्यात आली कल्याण गोरेबाग मधील परिसर संविधान दिनाच्या घोषणेने दुमदुमुन गेला होता. ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली होती.     त्यानंतर विद्यालयामध्ये  संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण व शिशुरंजन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री मानीवडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले    यावेळी प्रमुख वक्ते म्हूणन भिवा पवार सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ...
Image
  येरद आदिवासी वाडीत हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा    माणगाव (प्रतिनिधी )माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळ असणाऱ्या येरद आदिवासींमध्ये चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते  व 1930 चे जंगल सत्याग्रहांमध्ये हुतात्मा पत्करलेले हुतात्मा नाग्या महादू कातकरी तथा नाग्याबाबा यांचा 25 सप्टेंबर रोजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव तथा वनमित्र व आदर्श शेतकरी राम कोळी यांच्या हस्ते नाग्याबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.   यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हा सचिव राम कोळी यांनी उपस्थित बांधवांना नाग्या बाबांचा जीवनातील अनमोल माहिती देऊन मंत्रमुग्ध केले आपला आदिवासी समाज गरीब आहे, तो लाचार नाही, लढाऊ आहे, याची साक्ष इतिहासाची पाने देत असून याचे ज्वलंत उदाहरण  म्हणजे  चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते नाग्या बाबा आहेत असे सांगून "कधीही स्वाभिमान  विकू नका" पोटाच्या भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे हे नाग्या बाबांनी  आपल्याला दाखवून दिले आहे. तेव्हा सर्वांनी एकजुट...
Image
  रायगडातील पाली- खोपोली रोडवर बस व कारचा अपघात!    बसमध्ये एनसीसीचे 48 विद्यार्थी किरकोळ जखमी   पाली पोलिसांची घटनास्थळी तत्काळ  धाव,  सुदैवाने जीवित हानी नाही! रायगड -(प्रतिनिधी)खोपोली महामार्गावर बस व कारचा अपघात झाला आहे .  दिनांक 17 सप्टेंबर मंगळवारी एसटीचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एसटी बस MH -20 BL3367 ही कर्जत – खोपोली मार्गे माणगावला जात होती. तर सेलोरिया कार MH -14HD 5325 ही पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती. दापोडे गावाच्या हद्दीत एसटी बस आणि कार यांच्यात धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की एसटी बस पलटी झाली. लगेचच आजुबाजूचे लोक आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस  मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये 48 एनसीसीचे विद्यार्थी होते. त्या सर्वांना बसच्या मागील काच फोडून बाहेर काढण्यात आले.तर कार मध्ये प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजते.  रायगड जिल्ह्यात वारंवार एसटी बसचे अपघाताचे प्रमाण वारंवार वाढत असून  त्यामुळे रायगडकरांची चिंता वाढले . मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला आहे. पाली – ख...
Image
जीवन व्यवहारातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करू या!:-मा.विठ्ठलराव कांबळे ( कल्याण (विशेष प्रतिनिधी) जीवनातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करूया!असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत कार्यवाहक मा.श्री  विठ्ठलराव कांबळे यांनी व्यक्त केले छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित  कै. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन निमित्ताने नूतन ज्ञान मंदिर कर्णिक रोड कल्याण शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात  प्रमुख वक्ते श्री.विठ्ठलराव कांबळे यांनी राममंदिर ते राष्ट्रमंदिर  या विषयावर आपले विचार व्यक्त केले ते पुढे असे म्हणाले की साडेपाचशे वर्षांपासूनच्या हिंदुंच्या संघर्षाला आज यावर्षी यश आले. आयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना  आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. याचा *याचि देही याची डोळा* हा सोहळा मला पाहता आला या करिता मी खूप भाग्यवान आहे असे समजतो. मी व माझे कुटुंब कृतार्थ झालो. श्रीराम सर्वांचे आहेत. राम केवळ मुर्ती नाही तर राम ही आपली प्रेरणा ,चैतन्य आहे.   1992 ला मज सहीत इथे उपस्थित असलेले...
Image
  आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबन कोळी यांना मातृशोक! माणगाव (प्रतिनिधी ) आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असणारे तसेच रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे माणगाव तालुका उपाध्यक्ष तथा आदिवासी उद्योजक श्री बबन गणपत कोळी यांच्या मातोश्री कै.गौरी गणपत कोळी यांचे वयाच्या 60व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 60 होते त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाच्या सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच मुले व दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे दशपिंड व उत्तरकार्य वार रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी पानोसे ता.माणगाव येथे होणार आहेत कै. गौरी गणपत कोळी यांच्या निधनाने माणगाव तालुक्यात आदिवासी बांधवांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.