येरद आदिवासी वाडीत हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा
माणगाव (प्रतिनिधी )माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळ असणाऱ्या येरद आदिवासींमध्ये चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते व 1930 चे जंगल सत्याग्रहांमध्ये हुतात्मा पत्करलेले हुतात्मा नाग्या महादू कातकरी तथा नाग्याबाबा यांचा 25 सप्टेंबर रोजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव तथा वनमित्र व आदर्श शेतकरी राम कोळी यांच्या हस्ते नाग्याबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हा सचिव राम कोळी यांनी उपस्थित बांधवांना नाग्या बाबांचा जीवनातील अनमोल माहिती देऊन मंत्रमुग्ध केले आपला आदिवासी समाज गरीब आहे, तो लाचार नाही, लढाऊ आहे, याची साक्ष इतिहासाची पाने देत असून याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिरनेर जंगल सत्याग्रहाचे प्रेरणेते नाग्या बाबा आहेत असे सांगून "कधीही स्वाभिमान विकू नका" पोटाच्या भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे हे नाग्या बाबांनी आपल्याला दाखवून दिले आहे. तेव्हा सर्वांनी एकजुटीने राहा असे सांगितले.
यावेळी वनमित्र महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैदही कोळी खजिनदार शकुंतला वाघमारे,सदस्या अस्मिता कोळी तसेच वनमित्र ग्रुपचे राम कोळी, महादेव वाघमारे एकनाथ वाघमारे गणेश वाघमारे अनंत वाघमारे अरविंद कोळी कैलास वाघमारे राम पवार, विकास कोळी, मंगेश वालेकर सचिन वालेकर, महादेव वाघमारे, अजय कोळी, इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते. सदर हुतात्मा नाग्या महादू कातकरी तथा नाग्या बाबांचा स्मृतिदिन मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment