आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबन कोळी यांना मातृशोक!

माणगाव (प्रतिनिधी )आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असणारे तसेच रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे माणगाव तालुका उपाध्यक्ष तथा आदिवासी उद्योजक श्री बबन गणपत कोळी यांच्या मातोश्री कै.गौरी गणपत कोळी यांचे वयाच्या 60व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 60 होते त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाच्या सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच मुले व दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे दशपिंड व उत्तरकार्य वार रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी पानोसे ता.माणगाव येथे होणार आहेत कै. गौरी गणपत कोळी यांच्या निधनाने माणगाव तालुक्यात आदिवासी बांधवांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog