रायगडातील पाली- खोपोली रोडवर बस व कारचा अपघात! 

 बसमध्ये एनसीसीचे 48 विद्यार्थी किरकोळ जखमी

 पाली पोलिसांची घटनास्थळी तत्काळ धाव, 

सुदैवाने जीवित हानी नाही!

रायगड -(प्रतिनिधी)खोपोली महामार्गावर बस व कारचा अपघात झाला आहे .  दिनांक 17 सप्टेंबर मंगळवारी एसटीचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एसटी बस MH -20 BL3367 ही कर्जत – खोपोली मार्गे माणगावला जात होती. तर सेलोरिया कार MH -14HD 5325 ही पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती. दापोडे गावाच्या हद्दीत एसटी बस आणि कार यांच्यात धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की एसटी बस पलटी झाली. लगेचच आजुबाजूचे लोक आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस  मदतीला धावून आले. एसटी बसमध्ये 48 एनसीसीचे विद्यार्थी होते. त्या सर्वांना बसच्या मागील काच फोडून बाहेर काढण्यात आले.तर कार मध्ये प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजते.

 रायगड जिल्ह्यात वारंवार एसटी बसचे अपघाताचे प्रमाण वारंवार वाढत असून  त्यामुळे रायगडकरांची चिंता वाढले . मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला आहे. पाली – खोपोली मार्गावर दापोडे गावाजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. 

हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली. एसटी बसमध्ये एकूण 48 एनसीसी विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. काहींना किरकोळ मार लागला तर काहींना थोडासा मुकामार लागला आहे. मात्र, सर्व विद्यार्थी या भीषण अपघातातून बचावले बचावले असून कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाली असल्याचे समजते. सदर अपघात झाल्याचे समजताच पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.



Comments

Popular posts from this blog