जीवन व्यवहारातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करू या!:-मा.विठ्ठलराव कांबळे
( कल्याण (विशेष प्रतिनिधी)जीवनातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करूया!असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत कार्यवाहक मा.श्री विठ्ठलराव कांबळे यांनी व्यक्त केले छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित कै. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन निमित्ताने नूतन ज्ञान मंदिर कर्णिक रोड कल्याण शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री.विठ्ठलराव कांबळे यांनी राममंदिर ते राष्ट्रमंदिर या विषयावर आपले विचार व्यक्त केले ते पुढे असे म्हणाले की साडेपाचशे वर्षांपासूनच्या हिंदुंच्या संघर्षाला आज यावर्षी यश आले. आयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आपल्या सर्वांच्या साक्षीने झाली. याचा *याचि देही याची डोळा* हा सोहळा मला पाहता आला या करिता मी खूप भाग्यवान आहे असे समजतो. मी व माझे कुटुंब कृतार्थ झालो. श्रीराम सर्वांचे आहेत. राम केवळ मुर्ती नाही तर राम ही आपली प्रेरणा ,चैतन्य आहे. 1992 ला मज सहीत इथे उपस्थित असलेले अनेक कारसेवक आहेत की ज्यांच्या करसेवेने बाबरीचा एक - एक ढाचा पाडला गेला व सर्वव्यापी अस्तित्व असलेल्या प्रभूश्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची नवी ललकारी निर्माण झाली. आज या राममंदिरामुळे देश एका वेगळ्या उंचीवर स्थिरत्व प्राप्त करतोय याचा सार्थ अभिमान वाटतो.
जग आज भारताकडे एक विकसित राष्ट्र, आदर्श राष्ट्र म्हणून पाहत आहे यामुळेच राममंदिर ते राष्ट्रमंदिर यातील आता राष्ट्र मंदिराची आपण सेवा करू या.जीवन व्यवहारातील प्रत्येक कृती ही राष्ट्र मंदिर निर्माण करण्यासाठी अर्पित करु या. असे प्रतिपादन श्री.विठ्ठलराव कांबळे यांनी करून सर्वांना अंतर्मुख केले.
संघाचे स्वयंसेवक, प्रचारक ते सामाजिक कार्य करण्यासाठी निमित्त म्हणून राजकीय क्षेत्रात तत्कालीन काळात खासदार म्हणून ठाणे जिल्ह्यातून निवडून आले व समाजाची सेवा करून लोकप्रतिनिधी म्हणून नवीन आदर्श निर्माण केला.अखिल समाजाला आधारवड ठरणाऱ्या कै.रामभाऊ म्हाळगी यांचा स्मृतीदिन 6 मार्च 24 रोजी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
नुतन ज्ञान मंदिर कर्णिक रोड कल्याण या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.नंदकिशोर जोशी व प्रमुख वक्ते संघाचे कोकण प्रांत कार्यवाह श्री.विठ्ठलराव कांबळे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक बंधू - भगिनींनी सुमधूर आवाजात ईशस्तवन व राज्यगीत गायन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे अध्यक्ष श्री.नंदकिशोर जोशी यांनी संघाचे प्रचारक ते खासदार म्हणून कै.रामभाऊ म्हाळगी यांचा जीवनप्रवास कथन केला. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आदर्शवत व प्रेरणादायी मानून संस्था दरवर्षी 6 मार्च हा त्यांचा स्मृतीदिन अभिवादन कार्यक्रम म्हणून संपन्न करत असते. देशासमोरील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत राहून देशाचे भावी सुजाण ,सुसंस्कृत नागरिक घडवत आहात याचा सार्थ अभिमान वाटतो. अनेक आव्हांनांना तोंड देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आज आपण संस्थेच्या या कार्यक्रमाला सर्वजण गणवेशात शिस्तीचे पालन करून एक नवीन पायंडा घालून दिलात त्याबददल सर्वांना धन्यवाद देतो असेही त्यांनी मत व्यक्त केले.
वक्ते परिचय व स्वागतानंतर संस्थेने शिक्षकांनी लिहीलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात आपले कर्तव्य म्हणून काम करताना आदर्शवत गुणवंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे सरचिटणीस डॉ.श्री.निलेश रेवगडे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.श्री.ना.के.फडके यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
Comments
Post a Comment