Posts

Showing posts from May, 2025
Image
  ऑपेरेशन सिंदूरच्या यशस्वी नंतर कोलाड मध्ये मिठाई वाटून फटाके फोडून केला जल्लोष!     कोलाड (विश्वास निकम )  जम्मु काश्मीरच्या पहलगाम येथे २२एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात धर्म विचारत २६ कर्त्या पुरुषांना मारले गेले.त्याचा बदला म्हणून १५ दिवसानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्योस्त करीत "ऑपरेशन सिंदूर,यशस्वी  केले याचा जलोष म्हणून कोलाड नाक्यावर सकल हिंदू समाजातर्फे मिठाई वाटून फटाके फोटून विजयी जल्लोष  साजरा केला.    पहलगाम येथे भारतातील निरापराध २६ पुरुषांना धर्म विचारून दहशतवाद्यानी ठार मारले. याचा बदला म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा बदला घेण्यासाठी मोहीम आखली.  या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले.या नावाने भारतीय सौनिकांनी पाकिस्तान येथील ९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर  हल्ला करून हे अड्डे उद्योस्त केले या ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैनिकांचे कौतुक करण्यात येत आहे.    याचा जलोष म्हणून कोलाड नाक्यावर बुधवार दि.७ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सकल हि...
Image
 द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाडचा बारावी सायन्स निकल १०० टक्के,८६.८३ टक्के गुण मिळवून पार्थ भोईर प्रथम!   कोलाड (विश्वास निकम )  महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळा तर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दि.५ मे २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर झाला.या परीक्षेत कोलाड येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे द.ग. तटकरे व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला असुन कुमार पार्थ दिनेश भोईर ८६. ८३ टक्के गुण संपादन करून कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण उत्तीर्ण झाला आहे तर विराज दादासाहेब हाटे८१.३३%गुण संपादन करून द्वितीय,शताक्षी अमित खराडे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.                तसेच कॉमर्स इंग्लिश मिडीयम निकाल ९५.३०% एवढा लागला असुन विधी भोपाळ राव ८०.६७% गुण संपादन करून प्रथम,सृष्टी बाबू देशमुख ६८.६७%गुण मिळवून द्वितीय,कस्तुरी रोहिदास शेडगे ६८. ६७% गुण मिळवून तृतीय तर यश हनुमंत कर्णे६८% गुण मिळवून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तसेच १२ वी. कॉम...
Image
  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर ट्रॅकला आग,माणगाव तसेच धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्या मदतीने आग आटोक्यात,   कोणतीही जिवीत हानी नाही!     कोलाड (विश्वास निकम)  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील माणगाव पासून एक किलोमीटर अंतरावर महाड बाजुकडून दहिसरकडे स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र. एम. एच.०४ एम एच ५६९३ या ट्रकला सोमवार दि.५ मे २०२५ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही ट्रक चालकाच्या लक्षात येताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले.येथील स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दल व माणगाव पोलिस यांना फोन वरून संपर्क साधला असता घटना स्थळी माणगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली परंतु ट्रकमधील साहित्य ज्वलनशी असल्यामुळे आग विजविण्यासाठी अडथळे येत होते.यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडथळे येत होते.    यानंतर धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. रात्री साडेबारा वाजता आगी वरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले ज...
Image
  श्री स्वामी समर्थ मठ भुवन येथे सत्संग गुरुपादुका पुजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा कोलाड (विश्वास निकम) श्री स्वामी समर्थ मठ भुवन येथे श्री स्वामी समर्थ सेवकरी यांच्या वतीने सत्संग मेळावा व गुरूपादुका पूजन सोहळा शनिवारी ३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ कृपेने व परमपूज्य गुरुवर्य आण्णासाहेब म्हस्के यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुमाऊली अस्मिताआई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ मठ केंद्र भुवन येथे श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा व गुरूपादुका सोहळा तसेच धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन भुवन स्वामी सेवेकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते. गुरुमाऊली आण्णासाहेब म्हस्के यांच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या अनमोल विचारांतून पावन झालेल्या भुवन गावात आयोजित करण्यात आलेल्या या सदरच्या कार्यक्रमात सकाळी ८ वाजता भूपाळी आरती सकाळी १०:३० वाजता - नैवेद्य आरती, ११:०० वाजता स्वामीयाग तद्नंतर भक्तांसाठी प्रश्नोत्तरे  दुपारी ०२ वाजता - महाप्रसाद पुन्हा सायंकाळी ५:३० वाजता-प्रदक्षिणा, ०६ वाजता - नैवेद्य आरती  ६:३० वाजता गुरु...