मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर ट्रॅकला आग,माणगाव तसेच धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्या मदतीने आग आटोक्यात,
कोणतीही जिवीत हानी नाही!
कोलाड (विश्वास निकम) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील माणगाव पासून एक किलोमीटर अंतरावर महाड बाजुकडून दहिसरकडे स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणाऱ्या ट्रक क्र. एम. एच.०४ एम एच ५६९३ या ट्रकला सोमवार दि.५ मे २०२५ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
ही ट्रक चालकाच्या लक्षात येताच ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले.येथील स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दल व माणगाव पोलिस यांना फोन वरून संपर्क साधला असता घटना स्थळी माणगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली परंतु ट्रकमधील साहित्य ज्वलनशी असल्यामुळे आग विजविण्यासाठी अडथळे येत होते.यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडथळे येत होते.
यानंतर धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. रात्री साडेबारा वाजता आगी वरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले जवळ जवळ ५० हजार लिटर इतका पाणी वापरण्यात आल्यानंतर सकाळी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान माणगाव अग्निशमन दल,धाटाव अग्निशमन दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, माणगाव पोलिस, स्थानिक नागरिक यांच्या अथक प्रयत्नाने आगी वरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.परंतु या आगीत ट्रक व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment