श्री स्वामी समर्थ मठ भुवन येथे सत्संग गुरुपादुका पुजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

कोलाड (विश्वास निकम) श्री स्वामी समर्थ मठ भुवन येथे श्री स्वामी समर्थ सेवकरी यांच्या वतीने सत्संग मेळावा व गुरूपादुका पूजन सोहळा शनिवारी ३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ कृपेने व परमपूज्य गुरुवर्य आण्णासाहेब म्हस्के यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुमाऊली अस्मिताआई म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ मठ केंद्र भुवन येथे श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा व गुरूपादुका सोहळा तसेच धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन भुवन स्वामी सेवेकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.

गुरुमाऊली आण्णासाहेब म्हस्के यांच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या अनमोल विचारांतून पावन झालेल्या भुवन गावात आयोजित करण्यात आलेल्या या सदरच्या कार्यक्रमात सकाळी ८ वाजता भूपाळी आरती सकाळी १०:३० वाजता - नैवेद्य आरती, ११:०० वाजता स्वामीयाग तद्नंतर भक्तांसाठी प्रश्नोत्तरे दुपारी ०२ वाजता - महाप्रसाद पुन्हा सायंकाळी ५:३० वाजता-प्रदक्षिणा, ०६ वाजता - नैवेद्य आरती ६:३० वाजता गुरुकन्या राणीताई व दिपाताई यांचे अमृतमय वाणीतून उपस्थित स्वामी सेवकरी भक्तगणांना परमपूज्य गुरुवर्य आण्णांसाहेब म्हस्के रचित स्वामी गीत गायन व प्रवचनातून मंत्रमुग्ध करून विवेचन केले तर आपल्या अनमोल वाणीतून स्वामींचे विचार मांडताना सांगितले की आपणास गुरुमाऊली आण्णांनी दिलेला भक्तीचा मार्ग श्री स्वामीं समर्थांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.यासाठी स्वामींची भक्ती करा फळप्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.असे ध्यानाविषयी मौलिक मार्गदर्शन केले तर गायनातून गुरुकन्या राणीताई आणि अंबरनाथ येथून आलेल्या सेवेकऱ्यांनी साऱ्यांना मंत्रमुग्ध केले तर शेवटी प्रार्थना आरती म्हणून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.

तर सदरच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर तसेच ठीक ठिकाणाहून उपकेंद्रातून आलेले स्वामी सेवकरी भक्तांचे तसेच या कार्यक्रमासाठी उदार मनाने सढळ हस्ते मदत केली अशा दात्यांचे भुवन ग्रामस्थांच्या वतीने गुरुमाऊली अस्मिताई म्हस्के यांचे शुभस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आले.

तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी, महिला मंडळ, आदर्श मित्र मंडळ, मुंबईकर मित्र मंडळ, ग्रामस्थ मित्र मंडळ, भुवन यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog