द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाडचा बारावी सायन्स निकल १०० टक्के,८६.८३ टक्के गुण मिळवून पार्थ भोईर प्रथम!

 कोलाड (विश्वास निकम ) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळा तर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दि.५ मे २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर झाला.या परीक्षेत कोलाड येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे द.ग. तटकरे व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी सायन्सचा निकाल १०० टक्के लागला असुन कुमार पार्थ दिनेश भोईर ८६. ८३ टक्के गुण संपादन करून कॉलेज मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण उत्तीर्ण झाला आहे तर विराज दादासाहेब हाटे८१.३३%गुण संपादन करून द्वितीय,शताक्षी अमित खराडे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

               तसेच कॉमर्स इंग्लिश मिडीयम निकाल ९५.३०% एवढा लागला असुन विधी भोपाळ राव ८०.६७% गुण संपादन करून प्रथम,सृष्टी बाबू देशमुख ६८.६७%गुण मिळवून द्वितीय,कस्तुरी रोहिदास शेडगे ६८. ६७% गुण मिळवून तृतीय तर यश हनुमंत कर्णे६८% गुण मिळवून चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तसेच १२ वी. कॉमर्स मराठी मेडीयमचा निकाल ९५.३०% लागला असुन रिया राजेंद्र बर्जे ७४.६७% गुण संपादन करून प्रथम,दक्षता दिलीप पंदेकर ६५.१७%गुण संपादन द्वितीय,स्मृती सुनिल बामुगडे ६२.१७ % गुण संपादन करून तृतीय आली आहे.

तर १२ वी आर्टस् चा निकाल९२.३०% लागला असुन मृदुला जितेंद्र सार्लेकर ४८.३३% गुण संपादन करून प्रथम,इशा चंद्रशेखर सकपाळ ४६.३३% गुण संपादन करून द्वितीय,रुपाली धनाजी गुडेकर ४३.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

         तसेच १२ वी टेक्निकलचा निकाल ९४.४४ %लागला असुन साहिल सुनिल खरिवले ६४.६७% गुण संपादन करून प्रथम,यश संतोष महाबळे ६३.५०% गुण संपादन करून द्वितीय,सुशील संजय वाळंज ६२.८३% गुण संपादन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गिता ताई पारलेचा, मुख्यध्यापक सुखदेव तिरमले, माजी मुख्यध्यापक शिरीष येरुणकर सर, घोणे सर, डी.आर पाटील सर, अविनाश माळी, नागोठकर सर,सर्व वर्ग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog