ऑपेरेशन सिंदूरच्या यशस्वी नंतर कोलाड मध्ये मिठाई वाटून फटाके फोडून केला जल्लोष! 

 कोलाड (विश्वास निकम ) जम्मु काश्मीरच्या पहलगाम येथे २२एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात धर्म विचारत २६ कर्त्या पुरुषांना मारले गेले.त्याचा बदला म्हणून १५ दिवसानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्योस्त करीत "ऑपरेशन सिंदूर,यशस्वी  केले याचा जलोष म्हणून कोलाड नाक्यावर सकल हिंदू समाजातर्फे मिठाई वाटून फटाके फोटून विजयी जल्लोष  साजरा केला.

   पहलगाम येथे भारतातील निरापराध २६ पुरुषांना धर्म विचारून दहशतवाद्यानी ठार मारले. याचा बदला म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा बदला घेण्यासाठी मोहीम आखली.

 या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले.या नावाने भारतीय सौनिकांनी पाकिस्तान येथील ९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर  हल्ला करून हे अड्डे उद्योस्त केले या ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैनिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

   याचा जलोष म्हणून कोलाड नाक्यावर बुधवार दि.७ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सकल हिंदू समाज तर्फे " भारत माता की जय,वंदे मातरम,अशा घोषणा देत एकमेकांना मिठाई वाटून फटाके फोडून जलोष करण्यात आला.या यशस्वी मिशन बद्दल भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कोलाड परिसरातील असंख्य सकल हिंदू समाज उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog