मांजरवणे मोहल्यातील तरूणांनी जोपासला स्वच्छतेचा वारसा!

 मांजरवणे तरुणांचं होतंय सर्वत्र कौतुक!

     माणगाव (प्रतिनिधी)आज सर्वत्र तरूणाईवर अनेक कारणांमुळे अकारण टिका होत असताना माणगाव तालुक्यातील  मांजरवणे मोहल्ला येथील तरूणांनी सालाबादप्रमाणे मांजरवणे ते रानवडे या मार्गावरील पाच किलोमीटर वरील दुतर्फा वाढलेले गवत व छोटी अनावश्यक झाडे वेली तोडून स्वच्छतेचा वारसा जपला आहे. 

       मांजरवणे मोहल्यातील संस्कारशील तरूणांनी आपले कर्तव्य समजून ही स्वच्छता केली आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात. तरूणांनी केलेल्या या स्वच्छतेमुळे वळणावरील वाहनं दूरवरून दिसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होईल. 

       हे सामाजिक कार्य या गावाचे पोलीस पाटील जलील फिरफिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिब सनगे ,शादाब सनगे ,अमीर टोळकर ,आजम वलिले यांच्यासह अनेक तरूणांनी पुढाकार घेऊन ही स्वच्छता केल्याने या पंचक्रोशीत मोहल्यातील या तरूणांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog