सुभाष भोसले यांचे आकस्मित निधन
कै. सुभाष भोसले |
कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील वरसगांव येथील रहिवासी तसेच कोलाड वारकरी विभागाचे सदस्य सुभाष काशिराम भोसले यांचे बुधवार दि.२३/११/२०२२ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्षाचे होते. ते प्रेमळ व जिद्दी स्वभावाने सर्वाना परिचित होते.त्यांनी ड्रायव्हरची नोकरी करुन आपले कुटुंब मोठया जिद्दीने उभे केले.परंतु त्यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व वारकरी संप्रदायाचे असंख्य सदस्य व वरसगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुलगे, सून,व मोठा भोसले परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.६ डिसेंबर तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि.९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या वरसगांव येथील राहत्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment