पुगांव येथे आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव येथे शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते १ कोटी ४3 लाख रुपयाच्या जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व पुगांव बौद्धवाडी परिषद समाज सभागृहाचे उद्धघाटन करण्यात आले.यावेळी नारायण धनवी,रामचंद्र चितळकर,मनोज शिर्के,प्रकाश थिटे,संजय मांडळुस्कर ,श्रीकांत चव्हाण,मानसी चितळकर,सुधीर बारस्कर, प्रमोद म्हसकर,नंदकुमार झोलगे, घनश्याम बागुल, राम धूपकर, निलम कळमकर ,सुधीर शेळके, राम कळमकर, गोरखनाथ देवकर, किरण धूपकर, मारुती गोठम, दत्ताराम शेडगे, अशोक झोलगे,दिनेश देशमुख कृष्णराम देशमुख व असंख्य पुगांव ग्रामस्थ,महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होते.

          यावेळी आ.अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि सुनिल तटकरे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना पुगांव गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून सुरु केली होती.त्या संघर्षाच्या काळात पुगांव ग्रामस्थ तटकरे कुटूंबाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले होते.नंतर ३० वर्षांच्या कालावधीनंतर पुगांव गावातील लोकसंख्या वाढली असून वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेऊन नवीन पाणी पुरवठा योजना आवश्यक होती.

     दिड वर्षांपूर्वी ज्यावेळी मी पुगांव येथील जीर्णोद्धार सोहळ्यासाठी आलो होतो.त्यावेळी ग्रामस्थांकडून अंतर्गत रस्ते व नवीन पाणीपुरवठा योजनाची मागणी करण्यात आली होती.या संदर्भात पाठपुरावा करून आ.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून व खा. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नातून पुगांव गावातील अंतर्गत रस्ते व १ कोटी ४३ लाख रुपये जल जिवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.यापुढे ही पुगांव गावातील राहिलेली अनेक विकास कामे करण्यासाठी तटकरे कुटुंब नेहमीच पुगांव ग्रामस्थांच्या पाठीशी असेल अशी मी ग्वाही देतो.

Comments

Popular posts from this blog