एकाच कार्यक्रमाचे दोन नारळ फोडण्याची शेकापची संस्कृती नाही:-पंडितशेठ पाटील

खांब (नंदकुमार कळमकर ) पुरोगामी तसेच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा शेतकरी कामगार पक्ष आहे श्रमजीवी कष्टकरी शेतकरी वर्गासाठी झटणारा व त्यांना वेळोवेळी न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारा त्याच बरोबर आमदार असो अथवा नसो परंतु जनतेची विकास कामे कधीही थांबवणारा शेतकरी कामगार पक्ष नाही तर एकाच कामाचे दोन दोन नारळ फोडण्याची ही शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती नसल्याचे प्रतिपादन शेकापचे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी पुगाव येथे केले .

रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे शनिवारी 10 डिसेंबर रोजी स्व हरिभाऊ म्हसकर यांच्या शताब्दी प्रित्यर्थ श्री शंकरराव हरिभाऊ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व ग्रुप ग्राम पंचायत पुगाव तसेच आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्व हरिभाऊ म्हसकर सभागृह पुगाव येथे आयोजित करण्यात आले होते या शिबाराचे शुभारंभ माजी आ. पंडितशेठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील ,शंकरराव म्हसकर,शिवराम महाबळे, गणेश मढवी,महादेव मोहिते,मारुती खांडेकर सर ,वसंत मरवडे,समीर महाबळे,मनोहर महाबळे ,खेळू ढमाल, प्रकाश खांडेकर,बबलू सय्यद,दिवाणशेठ सानप,म्हात्रे, हरिश्चंद्र खांडेकर, यशवंत मोंडे, घनश्याम बागुल, तानाजी जाधव,शंकरा आय हॉस्पिटल टीमचे प्रमुख,डॉ प्रकाश पाटील, गंगाराम दळवी,हेमंत ठाकूर,विठ्ठल मोरे, लीलाधर मोरे,सरपंच नेहा म्हसकर, रचना कळमकर, अदिती झोलगे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश म्हसकर,संचालक सुनील म्हसकर बबन म्हसकर,आदी ग्रामस्थ व शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते .

म्हसकर कुटूंबियांनी त्यांच्या वडिलांच्या शताब्दी व स्मरणार्थ दोन दिवस विविध आरोग्य शिबाराचे प्रथमच सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजन केले असून चांगल्या तज्ञांचा मार्गदर्शन येथे लाभरणार आहे त्याच बरोबर मोफत उपचार देखील करण्यात येत असल्याचा आनंद व्यक्त करत याठिकाणी आज जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा भूमिपूजन,सामाजिक सभागृह, तसेच बौद्ध वाडीत बांधण्यात आलेल्या बौद्ध विहार सभागृहाचे लोकार्पण सोहळा आमच्या हस्ते आहे हे समजताच येथे रात्रीच बॅनर बाजी करून नारळ फोडण्यात आले तर थेट तोफ मुबंई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत डागली गेली दहा ते बारा वर्षे या मार्गाचे काम रखडले आहे पडलेले मार्गावर अनेक खड्डे त्यामुळेच कार्यक्रमास येण्यास उशीर झाला तर काही शेठ सत्तेत आहेत तरी देखील दुसऱ्यांनी केलेल्या कामांची नारळ फोडण्याची मोठी हौस आहे रायगडचे सात आमदार आहेत मात्र विधान सभेत जनतेचे प्रश्न मांडण्यास आवाज नाही तर ते जैसे थे आम्ही आमदार नसतानाही जनतेचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत आम्ही कोणाची जमीन घेत नाही ती शेतकऱ्यांना मिळवून देतो येथे भीती पोटी रात्रीच नारळ फोडली जातात निधी केंद्र सरकार आणि जिल्ह्य परिषदेचा असतांना नारळ फोडण्याची अति घाई असल्याचे सांगत रायगडचा खासदार दिल्लीत पाठवणे हे शेतकरी कामगार पक्षाच्याच हातात आहे हे कोणीही विसरून जाऊ नये असे शेवटी म्हणाले.

तसेच माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की शेतकरी कामगार पक्ष कष्टकरी वर्गाचा आहे येथील शेतकरी वर्गावर नेहमीच अन्याय होत आहे आधारभूत शेतकऱ्यांना पाच वर्षातून एकदा नुकसानभरपाई दिली जाते त्यात आता अधिक रक्कम वाढीसाठी प्रेयत्न केले पाहिजे रखडलेले नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगत मी येथे आलो माणसं आपली आणि कार्यक्रमाचे बॅनर भलतेच बघायला मिळाले कोणत्याही कार्यक्रमाचे फुकटचे श्रेय घेणारा शेतकरी कामगार पक्ष नव्हे पाटी लावून बॅनर बाजी करून दाखवणारा हा पक्ष नाही तर सर्व सामान्य माणसाच्या हृदयात सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे .

शंकरराव म्हसकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक विचार मांडताना सांगितले की जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना ही केंद्र सरकारची आहे सरपंच व सर्व सद्स्य यांनी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला तत्कालीन अध्यक्ष पारधी व उपाध्यक्ष पपुशेठ असतांना एक कोटी शेचालीस लाख रुपये निधी या ग्राम पंचायत मध्ये देन्यासाठी प्रयत्न केले मात्र आज त्याच देखील भूमिपूजन होते मात्र रात्रीच या ठिकाणी नारळ फोडली गेली काम कोणाचे आणि श्रेय घेतो कोण हे सर्यांच्याच लक्षात आले आहे वडिलांच्या शताब्दी निमित्ताने व त्यांच्या स्मरणार्थ दोन दिवस आरोग्य शिबीर आयोजित केले असल्याने येथील बहुसंखे रुग्णांना लाभ घेता येणार आहे .

यावेळी माजी आमदार पंडितशेठ पाटील व धैर्यशील पाटील,शंकरराव म्हसकर, गणेश मढवी मारुती खांडेकर यांच्या शुभेहस्ते नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबाराचे शुभारंभ व स्व हरिभाऊ म्हसकर सामाजिक सभागृह तसेच बौद्ध वाडी येथे बांधण्यात आलेल्या बौद्ध विहार व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.


Comments

Popular posts from this blog