नोकरी न मिळालेल्या तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे:-डॉ. मंगेश सानप

गोवे-कोलाड(विश्वास निकम)आधुनिक काळात शिक्षणाची प्रगती झाली.परंतु या स्पर्धेच्या युगात सर्वच तरुणांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे.यामुळे तरुण खचून जात असून निराश झालेले तरुण व्यसनाच्या आहरी जात आहेत.या तरुण वर्गानी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे असे मत डॉ. मंगेश सानप यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

      कोरोनामुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या यामुळे तरुणांवर उपासमारीची वेळ आली.परंतु तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोळवण (इंदापूर )येथील सुपुत्र सचिन साखरे! ते नाशिक येथे चांगल्या पगाराची नोकरी करीत होते.परंतु कोरोना काळात त्यांची नोकरी गेली परंतु ते खचून न जाता सचिन साखरे यांनी जुई नगर (वाशी ) येथे वडापावाचा व्यवसाय सुरु केला. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम प्रकारे सुरु आहे.

       इतर राज्यातील नोकरी न मिळालेले तरुण खचून न जाता कोणताही व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करीत आहेत मग आपले तरुण मागे का ? अशा सवाल कुणबी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. मंगेश सानप यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog