रोजगारासाठी मुंबईला न जाता गावातच रोजगार निर्माण करणारे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व:- चंद्रकांत खेडेकर

माणगाव (प्रतिनिधी)आज रोजगार हा गंभीर आणि प्रत्येकाचा  जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे   गावात रोजगार नसल्याने गावच्या गाव ओस पडू लागलेआहेत. लोक रोजगारासाठी शहराकडे वळायला लागले आहेत मात्र याला अपवाद आहेत रायगड जिल्ह्यातील  माणगाव तालुक्यातील मांजरोने विभागातील वडघर परिसरातील  वडाचीवाडी या गावातील  चंद्रकांत गणपत खेडेकर आहेत.

चंद्रकांत खेडेकर हे 40वर्षीय तरुण  मुंबईला न जाता आपल्या गावातच रस्त्याच्या बाजूला चंदू वडापाव नावाचे हॉटेल चालू केले या हॉटेलमध्ये वडापाव, पॅटीस,मंचुरियन,मिसळ,भेळ,यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असून चंद्रकांत खेडेकर यांच्या व्हेजिटेबल सुपला मोठ्या प्रमाणात मागणी असून हे सूप पिण्यासाठी माणगाव तालुक्यात तसेच साई, गोरेगाव, मोर्बा, दहीवली, मांजरोने चांदोरे नांदवी पुरार, म्हसळा, येथील अनेक खवय्ये  सुप पीण्यासाठी येत असतात.

 ते सीझन पाहून सुद्धा व्यवसाय करता ते म्हणतात" शेतात काय पिकते व बाजारात काय विकते याला महत्त्व असून सीझननुसार व्यवसाय करायला पाहिजे सध्या त्यांनी पेन येथील प्रसिद्ध गणपती विक्रीसाठी ठेवले असून अनेक लोकांनी बुकिंग केले आहेत उन्हाळ्यात लग्नसरामध्ये लग्न मंडप डेकोरेशन ही व्यवसाय करतात ती हॉटेलमध्ये सर्वांना रुचकर पदार्थ तर देतातच पण तिच्या गोड वाणीने ते खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक चाहते ही आहेत ती परिसरात सामाजिक कामे करतात.

 रोजगारासाठी मुंबईला न जाता गावातच व्यवसाय करायला पाहिजे:- चंद्रकांत खेडेकर

तरुणांनी रोजगारासाठी शहरात न जाता गावातच रोजगार निर्मिती केली पाहिजे गावातच व्यवसाय करायला पाहिजे आज गावे ओस पडत चालले असून गावाकडे  कोणाचेही लक्ष नाही म्हणून तरुण- तरुणीनी इतरत्र रोजगारासाठी  मुंबईला न जाता आपल्या गावातच व्यवसाय करायला पाहिजे नवीन व्यवसाय करा तरच आपला गाव सक्षम होईल कारण गावाची सेवा  हीच देश सेवा आहे  नवीन नवीन उद्योगधंदे निर्माण झाले तरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल व आपला देश मजबूत होईल असे चंद्रकांत खेडेकर म्हणतात. इतर ग्रामीण भागातील तरुणांनी  सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन गावातच रोजगार निर्मिती करण्याची आज खरी गरज आहे.

Comments

Popular posts from this blog