गोवे गावच्या शारदा जाधव यांचे आकस्मित दुःखद निधन
कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील गोवे गावच्या रहिवाशी शारदा सहादेव जाधव यांचे सोमवार दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता.सामाजिक कार्यात त्या नेहमी सक्रिय होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील असंख्य नागरिक,गोवे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन मुली,सुना,दिर,पुतणे,नातवंडे,पतवंडे व मोठा जाधव परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.१७ ऑगस्ट तर उत्तरकार्य विधी शनिवार दि.२० रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment