देवकान्हे येथील लक्ष्मीबाई भोईर यांचे दुःखद निधन

कै.लक्ष्मीबाई भोईर 

   गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील देवकान्हे गावाच्या रहिवासी लक्ष्मीबाई होनाजी भोईर यांचे शुक्रवार दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षांचे होते.त्यांचा स्वभाव प्रेमळ व परोपकारी स्वरूपाचा होता. त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,क्षेत्रातील असंख्य नागरिक, देवकान्हे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुली,पुतणे,सुना,जावई,नातवंडे व मोठा भोईर परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि.२१ तर उत्तकार्य विधी बुधवार दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog