समाजसेवक महेश मोरे यांना सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान,

 सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!

माणगाव(प्रतिनिधी ) आदिवासी समाजासाठी तन मन धन देऊन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विकासासाठी सदैव कटीबद्ध असणारे समाजसेवक महेश मोरे यांना सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आली.

  नवी दिल्ली येथे  संपन्न झालेल्या दीक्षान्त कार्यक्रमामध्ये महेश गोपाळ मोरे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सीडरब्रुक  युनिव्हर्सिटी ((USA) यांनी गोल्ड मेडल देऊन डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D) ही पदवी प्रदान करण्यात आली.महेश मोरे हे गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहेत.ते कृषी पदवीधर असून त्यांना समाज सेवेतील असलेली आवड पाहता अनेक कायद्यांना धरून त्यांनी आदिवासी समाजा मध्ये परिवर्तन घडवून आणलेले पाह्यला मिळत आहे. वनहक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा, रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा , कुळ कायदा यावर प्रभावीपणे कार्य केल्यामुळे त्यांना या पूर्वी रायगड भूषण पुरस्कार,(पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते ) व माणगाव तालुका आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी मित्र पुरस्कार देण्यात आला तसेच रायगड जिल्हाधिकारी मा.डॉ.महेद्र कल्याणकर साहेब यांच्या हस्ते जनजाती गौरव सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. महेश मोरे यांनी ग्रामीण उद्योज्गता  या विषयावर अभ्यास करून सामाजिक जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी अनेक महिला बचत गट,युवक ,युवती यांना रोजगाराची संधी निर्माण केली आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने CMEGP योजनेतून अनेक छोटे मोठे लघु उद्योगाची संधी उपलब्ध करुन दिली या योजनेची जन माणसात प्रभावीपणे माहिती देऊन युवकांना रोजगारा करिता मदत केली.

 आपल्या जीवनात अनेक चढ उतार त्यांनी पाहिले माझ्या सामाजिक कार्यात माझा परिवार माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला याचा मला गर्व आहे.माझे आई वडील,मित्र परिवार ,माझे सामाजिक जीवनातील गुरु व समाजसेवा कशी करावी  याचे धडे मी रिची भाऊ , थॉमस भाऊ यांच्या कडून गिरवले असे महेश मोरे यांनी आवर्जून म्हटले.सर्व विकास दीप संस्थेने अनेक कार्यकर्त्यांना घडविले त्यापैकी मी एक आहे.आपल्या कामात विश्वास व जिद्द असेल तर आपण समाज सेवेत उत्तम कार्य करू शकतो . सोशल वर्कर म्हणून मला गोल्ड मेडल देऊन डॉक्टरेट पदवी मिळाली या बद्दल युनिव्हर्सिटी चे मनापासून आभार मानतो असे शेवटी म्हटले.महेश मोरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 समाजसेवक महेश मोरे यांचे कार्य समाजासाठी कौतुकास्पद व प्रेरणादायी :-भिवा पवार 

 समाजसेवक महेश मोरे यांचे कार्य हे कौतुकास्पद तसेच प्रेरणादायी आहे. महेश मोरे हे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विविध आदिवासी वाड्यांमध्ये नित्याचा संपर्क असून आदिवासी समाजाच्या गरजा सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी ते सदैव कटिबद्ध असतात.त्यांचे जीवन हे त्यागमय असून त्यांचे कार्य हे कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. समाजसेवक महेश मोरे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सीडर ब्रुक  युनिव्हर्सिटी दिल्ली यांनी डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरवण्यात आल्याबाबत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भिवा पवार जिल्हा सचिव राम कोळी यांनी  समाजसेवक महेश मोरे यांचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog