Posts

Showing posts from September, 2025
Image
  मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुठवली गावानजीक  एसटी बसची स्कूटीला जोरदार धडक, युवती जागीच ठार तर तीचा भाऊ गंभीर जखमी    कोलाड (विश्वास निकम)  मुंबई गोवा महामार्गावर मुठवली गावच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन येथे एस टी बस चालकाने एका एक्सेस स्कुटी दुचाकीला धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.  सोमवार दि.१ सप्टेंबर रोजी खेड महाड पनवेल मुंबई ही एसटी महामंडळाची बस प्रवासी घेऊन मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना एसटी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मूठवली गावाच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन समोर एसटी क्र. एम. एच.२०बी.१९६० या एसटीने खांब बाजूकडे जाणाऱ्या स्कूटी क्र. एम एच ०६,सी.एच ४६६४ या स्कूटी ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला या अपघातात स्कुटी वरून प्रवास करणारी युवती देवयानी किशोर गोळे वय वर्षे अंदाजे (१९) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ सुजल किशोर गोळे वय वर्षे १६ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळ...