मुंबई-गोवा हायवेवरील सुकेळी खिंडीत भीषण अपघात!
टेम्पो चालक वाहनात अडकला!
भरधाव एसटीची टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक, कोणतीही जिवीतहानी नाही
कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा हायवेवर अपघाताची मालिका सुरु असुन मुंबई-गोवा हायवेरील कोलाड कडून नागोठणेकडे जाणाऱ्या टेम्पोला सुकेली खिंडीतील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला असुन टेम्पो चालक वाहनात अडकला.तसेच पाठीमागून येणाऱ्या भरधाव श्रीवर्धन बोरिवली एसटीने टेम्पोला जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणतेही जिवीत हानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे कि रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ सुमारास कोलाड कडून नागोठणेकडे जाणारा टेम्पो चालक यांनी सुकेली खिंडीतील उतारावर कालव्याच्या पुलावर आला असता अर्जंट ब्रेक मारला यामुळे टेम्पो रस्त्यातच फिरला हा अपघात एवढा गंभीर होता कि टेम्पो चालक टेम्पोत अडकला अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, SVRSS टीम,ऐनघर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी टेम्पो चालक याला बाहेर काढून उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे पाठविण्यात आले.
Comments
Post a Comment