सर्व अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांचा सन्मान करावा अन्यथा गय केली जाणार नाही:-भरतशेठ गोगावले

 

कोलाड (विश्वास निकम )या देशाचे देश सेवक ज्यांनी आपल्या आयुष्याची ऊन,वारा,पाऊस,थंडी याची कसली ही तमा न बाळगता आपल्या मातृभूमीची सेवा केली त्यांच्यामुळे आपण सुखाची झोप घेऊ शकतो.यामुळे तहसीलदार,कलेक्टर, प्रांत, कमिशनर,पोलीस अधिकारी तसेच इतर कोणतेही अधिकारी यांनी माजी सैनिकांचा सन्मान करावा अन्यथा त्या अधिकाऱ्यांची गै केली जाणार नाही हा माझा शब्द आहे असा इशारा श्री क्षेत्रपाल मित्र मंडळ पुई येथील सार्वजनिक उत्सवा निमित्त आयोजित माजी सैनिक व विरपत्नी यांचा सत्कार समारंभात भरतशेठ गोगावले(कॅबिनेट मंत्री, तथा रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री) यांच्याकडून देण्यात आला.

   यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष विजय अप्पा सावंत, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडीक,तालुका प्रमुख मनोज शिंदे,चंद्रकांत लोखंडे,तसेच विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, श्री.क्षेत्रपाल मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप, उपस्थित होते.

    भरतशेठ गोगावले पुढे मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि तुमची गावे वेगवेगळ्या पक्षाची असली तरी पण काळजी करू नका आमच्याकडे पक्ष पात नसतो पक्षपात करणारी वेगळी मंडळी आहेत हे तुम्हाला सर्वाना माहिती आहे.प्रसंग येत असतो पण त्यावेळी आम्ही उभे राहिलो नाहीतर त्याचा उपयोग काय? तुम्ही लांब वरून मला भेटायला येताय यामुळे मी जेवणावरून उठून येतो अंघोळकरून टॉवेल  लावून बाहेर येतो कोणाला वाटते कि अघोरी विद्या करून बाहेर येतो. ज्याचे घर मोठे असते त्याचे मन छोटे असते ते तुम्हाला साधी चहा ही विचारणार नाही. यामुळे माझ्याकडे अनेक योजना आहेत.यामध्ये वैयक्तिक विहीर,गुरांचा गोठा, कुकूड पालन शेड, मेंडी पालन शेड, बांध बंदिस्ती, बाबु लागवड, छोटे बंधारे,शेती दुरुस्ती,अशा अनेक योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा.

    यापूर्वी ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम खांबचे संस्थापक रवींद्र लोखंडे यांच्या शाळेतील स्काऊट गाईड पथक यांनी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व माजी सैनिक यांना नेत्रदीपक मान वंदना देण्यात आली.यानंतर कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सुभेहस्ते ३५ माजी सैनिक व वीर पत्नी यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच रायगड भूषण आंबेकर महाराज यांचा ही सत्कार करण्यात आला.तसेच माजी सैनिक वसंत जाधव व वसंत धामणे यांनी मनोगत व्यक्त करतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

       डॉ.सागर सानप यांनी प्रास्ताविक सादर करतांना मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कि भरतशेठ गोगावले चार वेळा आमदार झाले.एक वेळा तर मंत्री पदावर पाणी सोडले लोक सरपंच पदाची खुर्ची सोडत नाही परंतु कोणतेही पदाची अपेक्षा न करता भरत शेठ लोकांचे काम करीत राहिले या कामाच्या जोरावर शेवटी त्यांना आता मंत्रीपद मिळाले.तसेच सैनिकांनी त्याच्या वडिलांना लिहिलेले प्रासांगिक पत्र मन हेलावून टाकणारे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रवण कदम यांनी केले

       सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सागर सानप,अध्यक्ष विठ्ठल पवार ,उपाध्यक्ष सचिन लहाने, सचिव हरिश्चंद्र कदम, खजिनदार मंगेश सानप, उत्सव समितीचे अध्यक्ष दिनकर सानप सह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog