समाजसेवक महेश मोरे यांना सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव! माणगाव(प्रतिनिधी ) आदिवासी समाजासाठी तन मन धन देऊन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विकासासाठी सदैव कटीबद्ध असणारे समाजसेवक महेश मोरे यांना सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दीक्षान्त कार्यक्रमामध्ये महेश गोपाळ मोरे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सीडरब्रुक युनिव्हर्सिटी ((USA) यांनी गोल्ड मेडल देऊन डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D) ही पदवी प्रदान करण्यात आली.महेश मोरे हे गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहेत.ते कृषी पदवीधर असून त्यांना समाज सेवेतील असलेली आवड पाहता अनेक कायद्यांना धरून त्यांनी आदिवासी समाजा मध्ये परिवर्तन घडवून आणलेले पाह्यला मिळत आहे. वनहक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा, रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, बाल विवाह प्रतिबंधक कायदा , कुळ कायदा यावर प्रभावीपणे कार्य केल्यामुळे त्यांना ...