घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोप पावलेली चतुर्भुज विरगळाचे शिवऊर्जा मित्र मंडळाने केले पुनर्वसन!

 इतिहासाला उजाळा देण्याचे शिवऊर्जा मित्र मंडळाचे कौतुकास्पद कार्य!

 रोहा (राजेश हजारे) आपला इतिहास हा वास्तूचे रूपात जिवंत असतो तो कायम टिकवा त्याकरीता पुरातत्त्व विभाग काम करत आहे पण आपल्या  दैदीप्यमान इतिहास आहे तो जिवंत राहावा पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी  म्हणून माझी भारतीय नागरिक म्हणून माझे काहीतरी कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि याच भावनेतून इतिहास जिवंत राहावा कायम टिकावा यासाठी शिव ऊर्जा मित्र मंडळ  गेली अनेक वर्ष झटत आहे.

 नुकतेच घोसाळगडाच्या पायथ्यालगत मातीत लोक पावलेली चतुर्भुज  विरगळाची शिव ऊर्जा मित्र मंडळांनी पुनर्वसन केले असून या कामगिरीने संबंध रायगड जिल्ह्यातून शिव ऊर्जा मित्र मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वराज्याचा साक्षीदार असलेला घोसाळगड ऊर्फ विरगडाच्या पायथ्यालगत गावाबाहेर शिवमंदिर आहे

 या शिवमंदिरा जवळच दोन पुरातन विहीरी व तलाव आहे त्याची पहाणी करीत असताना चौकोनी पुरातन विहीरीच्या बाजुस मातीमध्ये लुप्त झालेली विरगळ ही शिवऊर्जा मित्र मंडळाच्या सदस्यांच्या नजरेस पडली. सदर ही विरगळ घोसाळे येथील तरुण ग्रामस्थ  व शिवऊर्जा मंडळाचे सदस्य यांच्या सहयोगातून ती बाहेर काढण्यात आली.

 हा अमुल्य इतिहासकालीन ठेवा मिळाल्याने घोसाळगड च्या इतिहासात नक्कीच भर पडेल. सदर विरगळ ही चतुर्भुज असुन तीचा कालखंड हा शिलाहार काळातील असावा असे विरगळ व सतिशिळा  अभ्यासक जाणकार तज्ज्ञ श्री अनिल दुधाणे यांचे मत आहे.

 ह्या विरगळचा इतिहास हा पायदळाशी लढाई करताना विरमरण आले असे पहील्या कप्यातील अर्थ आहे.

 दुसऱ्या कप्प्यात स्वर्गरोहणाचा देखावा आहे. येथे चवरीधारी अप्सरा विरास पालखीतुन घेवुन जात आहेत असे दाखविले असल्याने विरास पालखीचा मान असल्यामुळे विराचा पराक्रम खुप मोठा आहे किंवा तो विर राजघराण्यातील कोणीतरी मोठा विषेश अधिकारी असावा असे अनुमान निघते. 

विरगळाच्या तिसऱ्या कप्यात स्वर्गप्राप्तीचा देखावा आहे. यात नेहमीप्रमाणे मध्यभागी शिवलिंग असुन उजव्या बाजुस स्वर्गाचा प्रतीनिधी पुरोहीत आहे. त्यांनी डोक्यावरती गोलाकार पगडी परिधान केलेली आहे शंकराच्या पिडींवर बिल्वपत्र किंवा भस्म वाहत आहे. विर शिवलिंगाजवळ नमस्कार मुद्रेत बसलेला आहे. तो शिवउपासनेत मग्न झालेला आहे असे दिसते. ही विरगळ सर्व इतिहास प्रेमींना पहाता यावी यासाठी घोसाळे गावाबाहेर असणाऱ्या शिवमंदिराबाहेर दिपमाळेजवळ ग्रामस्थांच्या मदतीने ठेवण्यात आली आहे.

विरगळा शेजारी उभे असलेले शिवऊर्जा मित्र मंडळाचे पदाधिकारी दिप्रेश सावंत,समीर दळवी,किशोर रोहेकर,अरुण साळुंखे, रोहीत दळवी,छायाचित्रात दिसत आहेत.(छाया-राजेश हजारे रोहा,)


Comments

Popular posts from this blog