शिवऊर्जा मित्र मंडळाची प्लॅस्टिक मुक्त घोसाळगड स्वच्छता मोहीम!

उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!

 रोहा: (राजेश हजारे) मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये घोसाळगडाला असंख्य पर्यटकांची भटकंती सुरु असुन गडावर जाणाऱ्यांची संख्या शेकड्यात आहे. पण, आजचा रविवार घोसाळगड साठी हटके ठरला. प्लास्टिक कचऱ्याने वेढलेल्या घोसाळगडावरील खिंड दरवाजा तसेच घोड्याची पागा ह्या परीसराने रविवारी मोकळा श्वास घेतला.

 सकाळ पासूनच मंडळाच्या सदस्यांनी तिन तासात सुमारे पाच बॅगा प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच बियरचे टिन हे एकत्र संकलीत केले.

घोसाळगडाच्या खिंड दरवाजाच्या पायथ्याला सकाळी सात वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. खिंड दरवाजा व घोड्याचा पागा अशा दोन भागात ही मोहीम राबविण्यात आली. पायवाटेवर, झुडुपांमध्ये कुठेही फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे या वेळी उचलण्यात आली. पायथ्याला पाच पोती भरून प्लास्टिक जमा झाले. मंडळातील सदस्यांनी व लहान मुलांनी गडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन कचरा गोळा केला.


हा गड शिलाहार काळापासून वैभवाच्या खुणा जपत आहे कातळात कोरलेल्या सरळ पायऱ्या व गनिमांना चकवा देणारा खिंड दरवाजा ह्या किल्याचे खास वैशिष्ट्य आहे.* गडाच्या पायथ्यालगत खिंड दरवाजा व घोड्यांचा पागा ह्या जागी स्वच्छता मोहिमेसाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी लाभले.
निरक्षरतेमुळे पूर्वी जनजागृती ही गावोगावी केली जायची पण आज समाजात साक्षरतेचे प्रमाण वाढले असुन सुशिक्षित लोकांना पाण्याची बाटली तसेच अन्य कचरा गडाच्या परीसरात टाकु नये हे सांगण्याची वेळ यावी हे दुर्दैवी बाब आहे!

प्लॅस्टिकच्या बाॅटलचा वापर टाळण्यासाठी जनजागृती फलक गडाकडे जाणाऱ्या रस्तालगत लावण्यासंबधीत नियोजन करुन व घोसाळे ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम लवकरच घेवु असे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog