पुण्यातील शिवराय आर्ट ला शिवप्रेमींची पाठीवर कौतुकाची थाप!

स्वराज्याचा विठ्ठलाने त्या पायरीवर पाय ठेवावा, अन् चरणधुळीने माझ्या नावावर सदैव अभिषेक व्हावा एवढीच इच्छा!


रायगड (राजेश हजारे, भिवा पवार )ध्येय ऊराशी ठेवुन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करणारे स्वराज्याचे रायगड बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर यांच्याविषयी प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात आदर असतो.

इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे.स्वराज्याच्या संबधीत बोलका इतिहास शिलालेखातुन आपल्या पर्यंत पोहचत असतो.असाच एक इतिहासातील भाग म्हणजे दुर्ग दुर्गेश्वर रायगड वरील केलेले बांधकाम जोवर चंद्र सुर्य नांदतील तोवर ह्या गडाचे बांधकाम अबाधित राहील असे ठामपणे सांगणारे स्वराज्यातील दुर्ग बांधकाम सिव्हिल इंजिनियर श्री हिरोजी इंदलकर यांची स्वराज्यापायी असणारी निष्ठा ही गडावरील पायरीच्या शिलालेखातुन समजते.

"तो नुसता पायरीचा दगड नसुन स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेचा, स्वाभिमानाचा पायरीचा  दगड आहे"

तो घराघरात पोहचला पाहीजे असे मनात विचार करुन शिवसमाधीला नतमस्तक होवुन शिवरायांचे आशिर्वाद घेतले आणी पुण्यातील शिवराय आर्टचे सर्वेसर्वा श्री व्यंकटेश वाघमारे या शिवप्रेमी युवकाने सलग सहा महीने त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करीत पायरीचा दगड म्हणजे स्वराज्याच्या निष्ठेची खुण ह्याचे घराघरात पुजन झाले पाहीजे

 या शिव विचाराने प्रेरित होवुन काम सुरु केले. वेळोवेळी अनंत अडचणींवर मात करीत आज तब्बल सहा महीने हे काम पुर्ण होत असुन चांदी व  सोने अशा विविध धांतुमध्ये *पायरीचा दगड प्रतिकृती* (६जुन ) राज्याभिषेक दिनी शिवभक्तांना उपलब्ध करुन देत आहेत. पायरीचा दगड ह्या संकल्पनेवर त्यांच्याशी चर्चा केली असता मागील दोन वर्षांपासून सुवर्ण होन प्रतिकृती व धार नसलेल्या वाघनख शस्त्राची प्रतीकृती शिवराय आर्ट मार्फत तयार करण्यात आली असता शिवप्रेमींकडुन उदंड प्रतिसाद मिळाला.

 या कार्यास नेहमी सहकार्य करणारे श्री पराग जगताप,ऋषी  पासलकर व मित्र- सहकारी हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी लाभले त्यामुळेच मी हे अवघड काम करु शकलो.

यापुढेही ते नवनवीन प्रतिकृतीवर भरपुर काम करणार असुन शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचे काम आम्ही शिवराय आर्ट मार्फत सामान्य शिवभक्तांच्या खिशाला परवडेल अश्या विविध प्रतिकृती लवकरच उपलब्ध करणार आहोत असे शिवराय आर्ट चे व्यंकटेश वाघमारे यांनी आपले मत मांडले.

Comments

Popular posts from this blog