जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार यांनी व्हेरिफिकेशन अंतिम तारीखेच्या आत कॅम्प लाऊन पुर्ण करावेत.उपायुक्त(पुरवठा) कोकन भवन, नवीमुंबई यांचा आदेश!
रोहा -गोफण (रघुनाथ कडू) उपायुक्त (पुरवठा)कोकन भवन नवीमुंबई तसेच जिल्हापुरवठा अधिकारी रायगड, अलिबाग यांजकडून रायगड जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांना व्हेरिफिकेशन करुन घेणे करीता कॅम्प लाऊन अंतिम तारीखेच्या (डेडलाईन)आत पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दिनांक ३०डिसेंबर पर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांनी कार्डधारकांना सुचना देऊन राहिलेले मेंबर्सची व्हेरिफिकेशन विहीत कालमर्यादा मध्ये पुर्ण करावेत.तसेच ज्या लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन होत नाही.व जे लाभार्थी या ठिकाणी रहात नाहीत.तशी यादी बनवीण्यात यावी.तसेच मयत लाभार्थी यांची यादी ग्रामपंचायत व नगरपंचायत यांचे कडून घेऊन लाभार्थी यांची नावे रेशनकार्ड मधून कमी करण्यात यावी.याच प्रमाणे सर्व रेशन दुकानदार यांनी आपल्या दुकानाचे सर्व फलक व नोंदवह्या,उपायुक्त तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांनुसार दप्तरअद्यावत ठेवणे अशा सुचनाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तरी ज्या लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन करायचे राहिले असतील त्यांनी आपल्या अधिकृत रास्त भाव धान्य दुकानदार यांना भेटून आपले व्हेरिफिकेशन करून घेण्यात यावी व सहकार्य करावे असे रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे वतीने कळवीण्यात येत आहे.
Comments
Post a Comment