विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

               रोहा -मेढा ( उदय मोरे )

       भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि.30 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

     कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, म्हणून अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरले नसलेल्या विद्यार्थ्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

    मुंबई विभागातील विविध महाविद्यालयात सन 2021-22 मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. 

      मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असेही प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog