माहितीच्या अधिकारात माहिती मागितली याचा राग मनात धरून शहापूर आदिवासी संघटनेच्या तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला!

 आरोपींचा शोध घेऊन त्वरित कारवाई न केल्यास आदिवासी आदिम कातकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा! 

 हल्ला होऊन आठ दिवस लोटले तरी आरोपी मोकाटच! पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार!

भिवंडी (प्रतिनिधी )माहिती अधिकार म्हणते म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वतंत्र्य आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे या हक्काचाच भाग म्हणजे माहितीचा अधिकार होय. प्रशासनात पारदर्शकता आल्यामुळे भ्रष्टाचारातही पायबंद बसू शकेल भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी माहितीचे अधिकार हे प्रभावी अस्त्र आहे. हे सर्वांनाच ज्ञात आहे. आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येत असल्यामुळे आपल्या आदिवासी सामाज्याच्या वाट्याला आलेल्या योजना कोणीतरी खातंय! आपला आदिवासी समाज मात्र उपाशीच मरतोय! हे जेव्हा लक्षात आले तेव्हा शहापूर आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हिलम यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित शाखा कार्यालय जव्हार जि. पालघर या कार्यालयात माहितीचा अधिकार दिला. मात्र माहिती अधिकाराची सुनावणी संपली असता घरी जाण्यासाठी निघालेल्या माहिती अधिकार अर्जदाराला रस्त्यात गाठून त्याच्यावर जीवे हल्ला करण्यात आला यामध्येआदिवासी कार्यकर्ते समाधान हिलम जखमी झाले असून पतंग शहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत  पत्रकारांना दिलेल्या  पत्रकात  असे म्हटले आहे की  आदिवासी आदिम कातकरी  संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष श्री समाधान हिलम वय 37रा  टेंभुर्ली  ता. शहापूर जि.पालघर यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित शाखा कार्यालय जव्हार येथे माहिती अधिकार अंतर्गत या  सन 2020,21, 22, 23, या वर्षामध्ये आदिवासींना राबवलेले योजना संदर्भात माहिती अधिकार अर्ज दिला होता. त्याची सुनावणी 30/012023 रोजी दुपारी 2:00 वाजता होती  समाधान हीलम व त्यांचा मित्र नारायण म्हसणे शाईन मोटरसायकल नं.MH-0 4 LS-8858 आदिवासी कार्यालय जव्हार पोहोचले.

शासकीय माहिती अधिकारी कार्यालय जव्हार  येथे सायंकाळी4:30 प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील व राजेश पवार यांचे समक्ष सुनावणी झाली. त्यानंतर समाधान हिलम त्याचा मित्र जव्हार बायपास रोडने घरी जात असताना सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास शिवनेरी ढाब्याच्या एक किलोमीटर पुढे गेलो असता पाठीमागून एफ झेड मोटरसायकल वर ( नंबर माहित नाही) दोन अनोळखी इसमाने समाधान हिलम यांची कॉलर पकडली व मोटरसायकल वरून खाली पडले. व माझ्याजवळ येऊन म्हणाला की पवार साहेबांवर माहितीचा अधिकार का टाकला ? हे बोलून दोघांच्या हातात असलेल्या लोखंडी रॉडने  माझ्या कमरेवर दोन्ही  पायाच्या मांडीवर, पोटरीवर, हाताच्या पंजावर उपटी मारून दुखापत केली तसेच माझ्या मित्राला सुद्धा हाताच्या लाथा बुक्याने मारहाण केली लोखंडी रॉड व लाकडी दांडके तेथेच टाकून पळून गेले परत माहितीचा अधिकार टाकलास तर तुला बघून घेऊ अशी ठार मारण्याची धमकी दिली व माझा मोबाईल आपटून फोडून टाकला त्यानंतर माझ्या मित्रांने 112 नंबरचा कॉल केला थोड्या वेळाने पोलीस आले ते त्यांच्या गाडीमध्ये टाकून आम्हाला पतंग शहा कुटीर रुग्णालय जव्हार येथे ऍडमिट केले.

 याबाबत जव्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाली असून सहाय्यक फौजदार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत याबाबत जवळ पोलीस ठाण्यात सदर अनोळखी इसमानविरोधात, 324,323,506,427,43 गुन्हा दाखल करण्यात आला असून जव्हार पोलीस आरोपींचा शोध घेत आहे

 पोलिसांनी आदिवाशी समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन  करणार:- विश्वास वाघ,अध्यक्ष आदिवासीआदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य  

श्री.विश्वास वाघ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 

 पोलिसांनी आमच्या आदिवासी समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये सदर प्रकरण घडून आठ दिवस होऊनही आरोपी मोकाटच आहेत. आरोपींना अद्यापही अटक झालेले नाही ही खेदाची बाब आहे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे लोटली तरी अध्याप मात्र इथे आदिवासी सुरक्षित नाही. आदिवासींच्या वाटेला आलेल्या योजना  कोणीही खाऊन जावं शरमेची बाब आहे. सदर आदिवासी कार्यालयातील माहिती मागवलेले अधिकाऱ्याचे मोबाईल कॉल रेकॉर्ड चेक करून यामधील मुख्य सूत्रधार कोण? आहे याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाने  आदिवासी समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कारण आमचे आदिवासी समाजाला इतिहास आहे ज्या ज्या वेळेला उठाव झाला त्या त्या वेळी पहिले योगदान हे आदिवासींनी दिलेले आहे. जर आदिवासी समाजाचे कार्यकर्ते समाधान हिलम यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव आंदोलन करू व अनुसूचित प्रकार घडला तर याला  सर्वस्वी जबाबदारी  जव्हार पोलिसांचीच असेल. तसेच जव्हार पोलिसांनी केलेल्या दिरंगाईबाबत  लवकरच पालघर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांसह  मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचा इशारा आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ यांनी पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

 मात्र आदिवासी कार्यकर्ते समाधान हिलम यांच्यावर हल्ला करून  आठ दिवस लोटले तरी अद्याप काहीच पत्ता न लागल्याने जव्हार पोलिसाच्यां कामकाजावर आदिवासी समाजातून पूर्णपणे नाराजी व्यक्त केली जात असून संशय व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog