Posts

Showing posts from December, 2025
Image
  बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारा विरुद्ध सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी तर्फे पोलीस स्टेशनला दिले निवेदन     कोलाड: (विश्वास निकम )  बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे अत्याचार, हिंदूंची घरे-दुकाने जालने दिपु चंद्रदास या हिंदू तरुणाची कट्टरनक्षलवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज कोलाड मार्फत कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना या घटना रोखण्यासाठी राजकीय हस्तक्षेप व आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले.    बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदूविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणे गरजेचे असुन सरकाने त्वरित अंमलबजावणी करावी. बांगलादेशावर तात्काळ आर्थिक,व्यापारीक व राजनैतिक निर्बंध घालावे. बांगलादेशामधील कट्टरतावादी गटांविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय कार्यवाई करण्यात यावी अशी आग्रहाची मागणी सकल हिंद समाजाची आहे. भारताने जागतिक स्तरावर दबाव आणुन बांगलादेशातील  हिंदूंचे रक्षण करावे.बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदुविरोधी हिंसाचार थांबविण्यासाठी भारत...
Image
  चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन!     को लाड (विश्वास निकम )   रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी पंचायतीमध्ये  मा. बाळासाहेब ठाकरेस्मुती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे कामाचा भूमी पूजन सोहळा शनिवार दि १३ डिसेंबर रोजी रायगडचे कार्यसम्राट खा. सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.      यावेळी युवा नेते राकेश शिंदे, रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील, जेष्ठ नेते नारायण धनवी,रामचंद्र चितळकर, गडकिल्ले प्रेमी श्री शेलार,नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, दर्शन तेलंगे,संजय मांडळुस्कर,राकेश कापसे,विजय कामथेकर,बंधू राजाराम येरुणकर,पांडुरंग भोनकर, चिंचवली अध्यक्ष बबन येरुणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भिलारे, मारुती रामा मालुसरे,संतोष निकम, अजय निकम,प्रमोद तेलंगे, ग्रामसेवक शिंदे,ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक शिक्षक भोसले,तसेच हेटवणे,चिंचवली,बौद्धवाडी, आदिवासी बांधव तसेच परिसरातील असंख्य ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.