Posts

Showing posts from August, 2025
Image
  उत्कृष्ट कामगिरी करणारे आरोग्य सेवक सुधीर खैरे यांचा रातवड ग्रामपंचायती कडून सन्मान!   माणगाव(प्रतिनिधी) शासनाच्या आरोग्य  सेवेचा लाभ आदिवासी वाड्यावर पर्यंत गोरगरिबांपर्यंत मिळाव्या म्हणून सतत धडपडत असणाऱ्या व जनमानसात परिचित असणाऱ्या  आरोग्य सेवक सुधीर गणपत खैरे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित साधून  रातवड ग्रामपंचायतीने  आरोग्य सेवक  सुधीर खैरे यांचा   रायगड जिल्हा परिषद शाळा रातवड येथे शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन यथोचित  सत्कार करण्यात आला.  प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर रातवड येथे श्री.सुधीर गणपत खैरे हे आरोग्य सेवक म्हणून सेवा करतात आरोग्य सेवक  सुधीर खैरे यांनी रातवड येथील रातवड विभागात जनतेला उत्तम प्रकारे सेवा व चांगली वागणूक दिली. तसेच वेगवेगळ्या साथीच्या आजारामध्ये आदिवासी वाड्यांपर्यंत जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत सेवा देण्याचे कार्य केले. त्यांचा रातवड परिसरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत नित्याचा संपर्क आहे. त्यांच्या गोड मनमिळाऊ स्वभावामुळे परिसर...
Image
  स्मार्ट प्रीपेड मीटरला रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकाचा प्रचंड विरोध वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू देणार नाही :-उल्काताई महाजन सर्वहारा जनआंदोलन नेत्या  रोहा कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांना वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याचे निवेदन   रोहा (प्रतिनिधी)  महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना रायगड जिल्ह्यातील रोहा,माणगाव,तळा,अलिबाग व मुरुड तालुक्यात वीज ग्राहकांना न विचारता जुने चांगले मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येत आहे. मिटर लावण्यास प्रचंड विरोध रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकाचा आहे.जनतेचा विरोध लक्षात घेऊन सर्वहारा जन आंदोलनाच्या वतीने रायगड जिल्हातील वीज ग्राहकांचा मेळावा दि.१२.८.२०२५ रोजी पंचायत समिती सभागृह रोहा येथे स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड उल्का महाजन संस्थापिका सर्वहारा जन आंदोलन रायगड ह्या होत्या.प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व आयटक राज्य सचिव,कॉम्रेड भारती भोयर अध्यक्ष...